पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन; वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे: पुणे शहराचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे शनिवारी (दि.२७) दीर्घ आजाराने निधन झाले. मोहनसिंग राजपाल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यातच त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

संग्रहित छायाचित्र

पुणे: पुणे शहराचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे शनिवारी (दि.२७) दीर्घ आजाराने निधन झाले. मोहनसिंग राजपाल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यातच त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजपाल यांची पुण्याचे पहिले शिख महापौर अशी त्यांची ओळख होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचे विश्वासू म्हणून मानले जात. तसेच त्यांची 'बाबुजी' म्हणून ओळख होती.

मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर सेवक होते. शहराचा मध्यवर्ती पेठांचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९९६-९७  वर्षानंतर २००९ साली महापालिकेचे पुरूष महापौर म्हणून काम करणारे राजपाल हे दुसरे महापौर ठरले होते. तसेच पुणे शहारातील शीख समाजाचे ते पहिले महापौर होते. पुणे महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना २००९ ते २०१२ या अडीच वर्षांसाठी राजपाल यांनी महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

पुणे शहराचे महापौर म्हणून काम करताना बिनधास्त आणि स्पष्ट वक्तव्ये करणारे महापौर म्हणून मोहनसिंग राजपाल ओळखले जात होते. लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्याचा वादग्रस्त निर्णय महापौर असताना राजपाल यांच्या काळात झाला होता. त्याचे जोरदार पडसाद त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. त्यावेळी थेट पोलिसांना पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाचारण करावे लागले होते. मोहनसिंग राजपाल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तसेच काही निर्णयांचे त्यांनी थेट समर्थन केल्याने त्यांच्यावर महापालिकेच्या आवारात शाईफेक देखील करण्यात आली होती. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपुजनाची तारीख देखील महापौर असताना मोहनसिंग राजपाल यांनी अनेकदा थेट जाहीर करून धमाल उडवून दिली होती. यावरून त्यांच्यावर टीका देखील झाली होती. मात्र झालेली टीका कधीही त्यांनी मनाला लावून त्यांनी घेतली नाही. त्यांच्याविरोधात आंदोलन, टीका करणाऱ्यांशी देखील ते आपुलकीने वागत त्यांची चौकशी करत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळत होते. १९९--२००२ या काळात महानगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असल्याने महापौरपद राष्ट्रवादीकडे तर उपमहापौरपद काँग्रेसकडे होते. काँग्रेसने उपमहापौर म्हणून त्यावेळी प्रसन्न जगताप यांना संधी दिली होती. महापौरपदासाठी राजपाल यांचे नाव सुरूवातीपासून कधीही चर्चेत नव्हते. मात्र, अखेरच्या क्षणी राजपाल यांच्या नावाला पसंती देत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना महापौरपदासाठी संधी दिली होती. चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये त्यांच्या पत्नी जसबीरकौर राजपाल यांचे निधन झाले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून मोहनसिंग राजपाल देखील आजारी होते. एका खासगी हॉस्पिटलमध्ये शनिवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest