पुणे विद्यापीठातील रिफ्रॅक्टरीत नित्कृष्ट जेवण; मनसेने आंदोलन करत नित्कृष्ट जेवण प्रशासनातील अधिकाऱ्यांना लावले खायला

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (MNS) आज सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात (Savitri Bai Phule Pune University) तीव्र आंदोलन केले, रिफ्रॅक्टरीतील नित्कृष्ट जेवण प्रशासनातील अधिकाऱ्यांना चारले.

MNS Protest in SPPU

पुणे विद्यापीठातील रिफ्रॅक्टरीत नित्कृष्ट जेवण; मनसेने आंदोलन करत नित्कृष्ट जेवण प्रशासनातील अधिकाऱ्यांना लावले खायला

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (MNS) आज सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठात (Savitri Bai Phule Pune University) तीव्र आंदोलन केले, रिफ्रॅक्टरीतील नित्कृष्ट जेवण प्रशासनातील अधिकाऱ्यांना चारले. रेफ्रॅक्टारी चालक, भोजन समिती अध्यक्ष व कॅन्टीन मॅनेजर यांना याप्रसंगी जाब विचारून जो पर्यन्त जेवणाचा दर्जा सुधारत नाही तसेच विद्यार्थांना पौष्टिक, पोटभर आणि दर्जेदार जेवण माफक दरात मिळणार नाही तो पर्यंत विद्यार्थी जे जेवण दररोज जेवतात तेच जेवण दररोज विद्यापीठ प्रशासनाला खायला घालण्याची आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने घेण्यात आली. यावेळी मनविसे पदाधिकाऱ्यांनी जेवणाची ताटे थेट कुलगुरूंच्या ऑफिस आवारात नेली आणि जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावून विद्यार्थी खातात ते नित्कृष्ट जेवण संबंधितांना खायला घातले. (MNS Protest in SPPU)

विद्यापीठ प्रशासन जेवणानावर लाखो रुपये खर्च करतात, विविध कार्यक्रमांसाठी १०००- १५००  रुपयांचे जेवण बाहेरून मागवण्यात येते परंतु विद्यार्थ्याना मात्र त्यांच्या आरोग्याला त्रासदायक बेचव जेवण दररोज देण्यात येते. सुमारे पाच हजार विद्यार्थी दररोज याच रिफ्रॅक्टरी शेजारी शंकर महाराज मठातील मोफत अन्नछत्रातील खिचडी खातात परंतु रेफ्रॅक्टरी मध्ये फक्त २००-३०० विद्यार्थी च जेवतात , याचे कारण म्हणजे तेथील नित्कृष्ट , दर्जाहीन असे जेवण आहे. सुमारे ९८ % विद्यार्थी तिथे जेवत नाहीत आणि तेच विद्यार्थी रात्री उपाशी राहतात किंवा बाहेर खातात अशी विदारक परिस्थितीत विद्यापीठातील विद्यार्थी शिकत आहेत. याला जबाबदार असणाऱ्या सर्वांना मनविसे आपल्या पद्धतीने थाऱ्यावर आणणार आणि पुढील ७ दिवसात हक्काचे असे दर्जेदार, पौष्टिक पोटभर जेवण विद्यार्थांना मिळवून देणार आहे तो पर्यंत हे आंदोलनअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहणार आहे.या प्रसंगी कॅन्टीन मध्ये मनविसे कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणबाजी करून विद्यापीठाचा निषेध केला आणि यापुढे जेवणाबाबत काहीही तक्रार असल्यास अथवा कॅन्टीन चालक, प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर दबाव येत असल्यास मनविसे कडे संपर्क साधण्यास कळविले.

अमित ठाकरे यांनी जो अभूतपूर्व मोर्चा विद्यापीठात काढला होता त्यावेळी विद्यापीठातील जेवणाच्या दर्जाबाबत कुलगुरूंकडे आवाज उठविला होता आणि विद्यार्थ्यांच्या हक्काचं जेवण दर्जेदार आणि पौष्टिक मिळण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज आक्रमक आंदोलन करण्यात आले.

उप शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महा. राज्य कार्यकारणी सदस्य अभिषेक थिटे, विभाग अध्यक्ष आशुतोष माने, केतन डोंगरे विभाग सचिव सूरज पंडित, विभाग उपाध्यक्ष ऋषिकेश जगताप, निखिल राजपूत, प्रज्वल अडगळे, जय लायगुडे , प्रतीक अनगळ इत्यादी पदाधिकारी व विद्यापीठातील असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest