पुण्यातील पर्वती जवळ आढळली अनाधिकृत मजार; भाजपकडून कारवाईची मागणी
पुण्यातील मध्यवस्तीत असणाऱ्या पर्वती टेकडीवर मजार आढळली आहे. पर्वती टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या एका ओपन जिममच्या बाजूला ही मजार आहे. या मजारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर आता हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजपकडून पुढाकार घेत ती नष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या मजारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याच प्रभागात राहणारे भाजपचे माजी नगरसेवक धीरज घाटे यांनी ही मजार कोणाच्या जागेत आहे याबाबत चौकशीसाठी पर्वती टेकडीच्या देवस्थान ट्रस्टकडे विचारपूस केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मजार वनविभागाच्या जमिनीवर असल्याचे समजले. पर्वती टेकडीवर असणारी ही मजार अनाधिकृत आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी धीरज घाटे यांनी केली आहे.
दुसरीकडे या सगळ्या प्रकरणी मंगळवारी भाजपच्या शिष्टमंडळासह शहरातील इतर हिंदुत्ववादी संघटनांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी या मजारीसंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर जर ही जागा वनविभागाची असेल आणि वनविभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम झाले असेल तर त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.