"जग बदलण्याची ताकद योग आणि मल्लखांब शास्त्रात" - पद्मश्री श्री. उदय देशपांडे

मनो-वर्धन योगसंस्था आणि क्रीडाभारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भावेस्कूल पुणे येथे ही स्पर्धा संपन्न झाली.

Mallakhamba Shastra

या स्पर्धेत पुण्यासह मुंबई, नाशिक, सातारा, चिपळूण, वाईहून असंख्य स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पुरुष व महिला यांच्या एकूण आठ गटातील प्रत्येक पहिल्या तीन स्पर्धकांना ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले. 85 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांनीही सहभागी होत उत्कृष्ट योगासने सादर केली.

या  याप्रसंगी बोलताना पद्मश्री श्री. उदय देशपांडे म्हणाले 'योगासन स्पर्धांचं परीक्षण' ही विशेष कौशल्याची बाब असून नि:स्पृहपणे काम करणाऱ्या परीक्षकांचा नेहमीच आदर व गौरव व्हायला हवा. 'जग बदलण्याची ताकद योग आणि मल्लखांब शास्त्रात आहे' असंही मत स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी व्यक्त केलं.

यावेळी क्रीडाभारती संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पुरंदरे, पुणे महानगर अध्यक्ष प्रा.शैलेश आपटे, पुणे महानगर मंत्री विजय राजपूत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, मनो-वर्धन योगसंस्थेचे संचालक मनोज पटवर्धन,सहसंचालिका माधुरी पटवर्धन, सहसंचालक स्वानंद पटवर्धन उपस्थित होते. परीक्षक प्रमुख म्हणून सोनाली कानिटकर, चंद्रशेखर कुलकर्णी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे व्यवस्था प्रमुख म्हणून क्रीडा भारतीचे सहमंत्री भाऊराव खुणे यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest