श्री महालक्ष्मी मंदिरात शिव-पार्वती विवाह सोहळा थाटात

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात शिव -पार्वती विवाह सोहळा थाटात साजरा झाला.

Shree Mahalakshmi temple

श्री महालक्ष्मी मंदिरात शिव-पार्वती विवाह सोहळा थाटात

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजन

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात शिव -पार्वती विवाह सोहळा थाटात साजरा झाला. सारसबागेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील चौकातून सुरु झालेल्या वरातीचा समारोप मंदिरात झाला आणि मंदिरात विवाहसोहळा थाटात संपन्न झाला.

ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड आदी उपस्थित होते. प्रत्यक्ष शिव-पार्वती लग्नसोहळ्यात सहभागी प्रत्येक देवतांच्या वेशभूषेत कलाकार वरातीत सहभागी झाले होते. यावेळी भस्म देखील उधळण्यात आला.

भगवान शिव- माता पार्वती सह वीर हनुमान, देवर्षी नारद, नंदी आणि सर्व गण सहभागी झाले होते. यावेळी पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थिती लावत हा अभूतपूर्व सोहळा अनुभविला. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा 'सार्वजनिक नवरात्र उत्सव' मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. त्यानिमित्ताने या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest