पुणे : आयुक्त बदलले पण समस्या 'जैसे थे'

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) अंतर्गत सेक्टर १२ या ठिकाणी गृहप्रकल्प उभारला आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण झाल्या दिवसापासून या ठिकाणी समस्यांचे ग्रहण लागले आहे. ते सुटायचे नाव घेता येत नाही.

Pune Metropolitan Regional Development Authority, (PMRDA),housing project,Sector 12

File Photo

सेक्टर १२ उभारणारा बांधकाम व्यवसायिक पीएमआरडीएला डोईजड, आदेश दिल्यानंतरही केले नाही रहिवाशांच्या समस्यांचे निवारण

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) अंतर्गत सेक्टर १२ या ठिकाणी गृहप्रकल्प उभारला आहे. मात्र, हा प्रकल्प पूर्ण झाल्या दिवसापासून या ठिकाणी समस्यांचे ग्रहण लागले आहे. ते सुटायचे नाव घेता येत नाही. सदनिका अंतर्गत होणारी गळती, अपुरा पाणीपुरवठा यासह अर्धवट असलेल्या सोलरप्रकल्पाची कामे पूर्ण झाली नाहीत. पीएमआरडीएचे आयुक्त बदलले तरीही समस्या मात्र जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

सेक्टर १२  येथील रहिवाशी गेल्या वर्षभरापासून याबाबत पाठपुरावा करत आहे. या आधीच्या आयुक्तांनी केवळ आश्वासन दिले. मात्र, आयुक्त बदलानंतर काहीतरी कार्यवाही होईल असे अपेक्षित असताना, या आयुक्तांकडूनही समस्या मार्गी लागल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे संबंधित बांधकाम व्यावसायिक पीएमआरडीए अधिकाऱ्यांना अजिबात जुमानत नसल्याचे दिसून आले.

पीएमआरडीएने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सेक्टर १२ या ठिकाणी गृह प्रकल्प एक आणि दोन या ठिकाणी एकूण ४ हजार ८८३ सदनिका उभारल्या असून जवळपास ७० टक्के लाभार्थी वास्तव्यास आहे. सदनिकाधारकांना या ठिकाणी राहायला आल्यापासून गळतीची समस्या आहे. त्यामुळे एक, दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा सोसायटीधारकांनी याबाबत पत्रव्यवहार केला. मात्र दुर्लक्ष करण्यात आले.

तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांनी या ठिकाणी भेट देऊन कामे पूर्ण होण्याची आश्वासन घेणे होते. मात्र, त्यांची बदली होण्यापूर्वीही कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे नव्या आयुक्तांकडून ही रखडलेली कामे पूर्ण होण्याबाबत आशा निर्माण झाली. त्यानुसार नव्याने अर्ज आणि भेटीगाठी देखील सुरू केल्या. त्याची दखल घेत आयुक्तांनी ऑगस्ट महिन्यामध्ये नोटीस बजावली होती. त्यानंतर त्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्याचा आढावा घेण्यात आला व अंतिम मुदत म्हणून ५ ऑक्टोंबर देण्यात आली. परंतु अद्याप कामे झाली नाहीत, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच बांधकाम व्यावसायिक नागरिकांचे ऐकत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

रहिवाशी पुन्हा घेणार आयुक्तांची भेट

सेक्टर १२ या ठिकाणी असलेली प्रलंबित कामे पूर्ण झाली नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. दोन वेळा मुदत वाढ देऊनही बांधकाम व्यवसायिकांनी कामे पूर्ण होत नसल्याचे रहिवासी तक्रार करून थकले आहेत. त्यामुळे आता थेट आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यांना किती कामे पूर्ण झाली आहेत व कामाचा अहवाल आम्हाला दाखवा अशी म्हणण्यात येणार आहे. मी त्या दोन दिवसांमध्ये आयुक्तांची वेळ घेणार असल्याचे स्थानिक रहिवाशी ॲड.अतुल कांबळे यांनी सांगितले .

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest