खोटी माहिती देणाऱ्या चार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांनी खोटी माहिती सादर केल्याचे समोर आल्यावर त्यांची निवड रद्द करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा आदेश

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांनी खोटी माहिती सादर केल्याचे समोर आल्यावर त्यांची निवड रद्द करण्यात आली आहे.

पदव्युत्तर विद्यार्थी असलेल्या वर्धा येथील उल्का खोब्रागडे, गोंदिया येथील समीक्षा डोंगरे, रायगड येथील प्राची वानखेडे, पुणे येथील अथर्व कांबळे यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या जागी सर्वसाधारण प्रतीक्षा यादीतील सुशील रणवरे, मयूर थोरात, पल्लवी अमुले, रवी एवळे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिली. याबाबतचा शासन निर्णय विभागाने जाहीर केला.

शासनाने २००३ पासून राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ७५ विद्यार्थ्यांना ३० ऑगस्ट रोजी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. तसेच ३८ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत होते. मात्र, खोटी माहिती सादर केल्याच्या कारणास्तव खोब्रागडे, डोंगरे, वानखेडे, कांबळे यांची निवड रद्द करण्याचा प्रस्ताव समाजकल्याण आयुक्तांनी १३ सप्टेंबर रोजी सादर केला होता. त्यानुसार ही निवड रद्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमधील दोन वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिष्यवृत्ती मंजूर केलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण संपल्यावर देशाची सेवा करणे, देशाला त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेणे बंधनकारक राहील. निवड केलेल्या विद्यार्थ्यांनी परदेशातील अभ्यासक्रम दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ किंवा वाढीव खर्च दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest