झोपडपट्टीपण कमी नाही...

सिनसिनाटी विद्यापीठात इतिहास विषयातील एक मान्यताप्राप्त भारतीय-अमेरिकन संशोधक व प्राध्यापिका असलेल्या शैलजा पाईक यांनी झोपडपट्टीमधून देखील अभ्यासक आणि संशोधक तयार होऊ शकतात याचा वास्तूपाठ घालून दिला आहे. त्यांना दलित महिलांबद्दल संशोधन आणि लेखन करणाऱ्या भारतीय-अमेरिकन प्राध्यापिका शैलजा पाईक यांना मॅकआर्थर फाऊंडेशनतर्फे ८ लाख डॉलर्स म्हणजे सुमारे ६.७ कोटी रुपयांची 'जिनियस ग्रांट' ही फेलोशिप देण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Edited By Admin
  • Sat, 5 Oct 2024
  • 08:15 pm
Shailaja Pike, Indian-American scholar, Dalit, women, research, University of Cincinnati history professor, Genius grant recipient, Academic achievements of Indian-Americans, Slums producing scholars, Contributions of Dalit women, Indian-American history scholars, Shailaja Pike research impact, Notable Indian-American academics

संशोधक व प्राध्यापिका शैलजा पाईक

येरवडा झोपडपट्टी ते ७ कोटींची 'जिनिअस ग्रँट' फेलोशिप लेखिका शैलजा पाईक यांचा प्रेरणादायी प्रवास

पुणे : सिनसिनाटी विद्यापीठात इतिहास विषयातील एक मान्यताप्राप्त भारतीय-अमेरिकन संशोधक व प्राध्यापिका असलेल्या शैलजा पाईक यांनी झोपडपट्टीमधून देखील अभ्यासक आणि संशोधक तयार होऊ शकतात याचा वास्तूपाठ घालून दिला आहे. त्यांना दलित महिलांबद्दल संशोधन आणि लेखन करणाऱ्या भारतीय-अमेरिकन प्राध्यापिका शैलजा पाईक यांना मॅकआर्थर फाऊंडेशनतर्फे ८ लाख डॉलर्स म्हणजे सुमारे ६.७ कोटी रुपयांची 'जिनियस ग्रांट' ही फेलोशिप देण्यात आली आहे. या बहुप्रतिष्ठित मॅकआर्थर फेलोशिप मिळवणाऱ्या त्या पहिल्या दलित महिला बनल्या आहेत. महिला, लिंगभेद व लैंगिकतेचा तसेच आशियाई घडामोडींचा अभ्यास या विषयात देखील त्या सहयोगी प्राध्यापिका म्हणून काम करतात. त्यांचे संशोधन विशेषत: दलित महिलांवर आणि जातीय भेदभावावर केंद्रित आहे. 

शैलजा पाईक यांचे आयुष्य अत्यंत खडतर होते. त्यांचे कुटुंब मूळचे अहमदनगरमधील पोहेगावचे राहणारे आहे. दलित समाजात त्यांचा जन्म झाला. परंतु, पोटाची भूक भागवण्यासाठी हे कुटुंब पुण्यामध्ये स्थलांतरित झाले. येरवडा येथील झोपडपट्टीमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. एका अगदी लहान खोलीत त्यांचे कुटुंब राहात होते. शैलजा यांना तीन बहिणी आहेत. वडील देवराम आणि आई सरिता यांनी त्यांच्या शिक्षणावर भर दिला.

शिक्षणाबाबत अत्यंत गंभीर असलेल्या आईवडिलांनी प्रसंगी हालअपेष्टा सहन केल्या. परंतु, मुलींना चांगले शिक्षण दिले. त्यांच्या झोपडपट्टी ना पाण्याची सुविधा होता. ना शौचालयाची. घराच्या परिसरात नेहमी डुकरांचा वावर असायचा. घाण आणि कचरा अवतीभोवती असायचा. पाणी आणण्यासाठी त्यांना वस्तीतील सार्वजनिक नळावर जाऊन उन्हातान्हात रांगेत उभे राहावे लागत असे. 

शैलजा यांनी १९९४ साली पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून ‘बीए’ची पदवी घेतली. त्यानंतर १९९६ साली ‘एमए’ची पदवी प्राप्त केली. २००७ साली त्या यूकेच्या वॉरविक विद्यापीठात शिक्षणासाठी गेल्या. त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली. विद्यापीठाकडून मिळालेल्या फेलोशिपवर त्या अमेरिकेमध्ये गेल्या. याठिकाणी त्यांनी महाविद्यालयात शिकवण्यास सुरुवात केली.  साधारण २००८ ते २०१० या काळात त्यांनी युनियन कॉलेजमध्ये इतिहास विषयात व्हिजिटिंग असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

त्यांनी २०१४ मध्ये ‘दलित वुमन्स एज्युकेशन इन मॉडर्न इंडिया : डबल डिस्क्रिमिनेशन’ नावाचे पहिले पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रात दलित महिलांना शिक्षण घेताना येणाऱ्या आव्हानांबद्दल सडेतोड लिखाण केले. तद्नंतर त्यांनी २०२२ साली 'द वल्गारिटी ऑफ कास्ट: दलित, लैंगिकता आणि आधुनिक भारतातील मानवता' नावाचे दुसरे पुस्तक लिहिले. 

शैलजा यांच्या फेलोशिपची घोषणा करताना ‘मॅकआर्थर फाऊंडेशन’ने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दलित महिलांच्या आयुष्याशी निगडीत समस्यांवर लक्ष केंद्रित करून पाईक यांनी जातिभेदाचे स्वरूप आणि अस्पृश्यता कायम ठेवणाऱ्या आव्हानांवर आपल्या लिखाणामधून भाष्य केले आहे.

जातीय वर्चस्वाचा इतिहास आणि दलित महिलांची प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्व नाकारण्यासाठी असमानतेचा वापर कोणत्या मार्गांनी केला जातो याचा शोध त्यांनी आपल्या अभ्यासू लेखनातून घेतला आहे. त्यांनी 'तमाशा' मधील महिला कलाकारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्रात शतकानुशतके मुख्यतः दलित समाजामधील महिला तमाशात नाचवल्या गेल्या. याच प्रकल्पावर आधारित 'द वल्गैरिटी ऑफ कास्ट: दलित्स, सेक्सुअलिटी एंड ह्यूमनिटी इन मॉडर्न इंडिया' हे पुस्तक नुकतेच त्यांनी प्रकाशित केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest