संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) मार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी 'यूजीसी नेट' ही परीक्षा १ ते १९ जानेवारी २०२५ मध्ये होणार आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १० डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि पीएच.डी. प्रवेश यासाठी पात्रता परीक्षा म्हणून ही परीक्षा घेतली जाते. एकूण ८५ विषयांमध्ये संगणक आधारित चाचणी या पद्धतीने घेतली जाते. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
परीक्षेसाठीच्या ऑनलाइन अर्जाचे शुल्क भरण्यासाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदत आहे, तर ऑनलाइन अर्जात दुरुस्ती १२ ते १३ डिसेंबर या कालावधीत करता येईल, असे 'एनटीए'तर्फे सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएतर्फे घेतल्या जाणाऱ्या युजीसी नेट परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा सुधारणा केली आहे. येत्या २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ८३ विषयांची वेगवेगळ्या दिवशी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामधील २६ ऑगस्ट रोजी येणाऱ्या श्री कृष्ण जन्माष्टमी सणामुळे या दिवसाची सर्व परीक्षा २७ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. या दिवशी ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे. त्या विद्यार्थ्यांनी हा बदल लक्षात घ्यावा अशा सूचना केल्या आहेत.
गेल्या २ ऑगस्ट एनटीएने ८३ विषयांसाठी होत असलेल्या या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते, त्यानुसार हिंदी आणि तत्त्वज्ञान या विषयांची परीक्षा २६ ऑगस्ट रोजी पहिल्या सत्रात सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार होती. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजेच दुपारी ३ ते ६ या वेळेत हिंदी, उडिया, नेपाळी, मैनपुरी, आसामी आणि संथाली या भाषांच्या परीक्षा होणार होत्या. मात्र, आता नवीन बदलानंतर या विषयांच्या परीक्षा २७ ऑगस्टला त्याच सत्रामध्ये घेतल्या जाणार आहेत. ऑगस्ट परीक्षेच्या केंद्रानुसार सूचना स्लिप माहिती देण्यात येत आहे.