संग्रहित छायाचित्र
दीड महिन्यांपूर्वी साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी वाघोली येथील जे.एस.पी.एम. कॉलेज परिसरातून ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट सहाने ही कामगिरी केली.
आर्य अनुपसिंग ठाकुर (वय २०, रा. बकोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार ऋषिकेश रमेश झेंडे (वय-२३), अमन मुबारक शेख (वय-२३), मनिष अनिल उबाळे (वय २०, तिघे रा. वाघोली) यांना यापूर्वीच अटक केले होते. तर आर्य ठाकूर हा फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे युनिट सहाचे पथक शनिवारी (ता. २३) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करणे तसेच गुन्हे प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यावेळी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी आर्य ठाकूर हा वाघोली येथील जे.एस.पी.एम. कॉलेज परिसरात थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे व सचिन पवार यांना मिळाली.
गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक शनिवारी (ता. २३) लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत विधानसभा निवडणुक निकाल २०२४ च्या अनुषंगाने रेकॉर्डवरील आरोपी तपासणी तसेच गुन्हे प्रतिबंधक गस्त घालीत होते. यावेळी लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आर्य ठाकुर हा वाघोली येथील जे.एस.पी.एम. कॉलेज परिसरात थांबला असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी जावून आरोपीला ताब्यात घेतले, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी आर्य ठाकूर याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला लोणीकंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.