रायगडावर लाखोंच्या सख्येने शिवभक्त दाखल
यंदा रायगडावर ३५० वा राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने शिवभक्त जमायला सुरुवात झाली आहे. रायगडावर दोन दिवसांपासून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. यावेळी नाणेदरवाजा मार्गे पायी गड चढाई आला आहे. तर शिवरायांना मर्दानी खेळांची मानवंदना देण्यात आली आहे.
दुर्गराज रायगडावर सध्या लाखो शिवभक्त उपस्थित असून गडाच्या खाली जवळपास लाखभर शिवभक्त आलेले आहेत. इतके लोक गडावर एका वेळेस सामावणे शक्य नसल्याने गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्यासाठी घाई करू नये, अशी विनंती पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सध्या गडावर असणारे लोक दहा ते अकराच्या दरम्यान गड उतरतील आणि त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने खाली असलेल्या लोकांना वर सोडले जाणार आहे, असे आवाहन शिवभक्तांना गडावरून केली जात आहेत. गडावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी छत्रपती संभाजीराजे देखील आपल्या ट्विटरच्या माध्यमातून अनेक माहिती प्रसारित करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.