बालगंधर्व रंगमंदिरात छत्रपतींबरोबर पुरंदरेंचे शिल्प, संभाजी ब्रिगेडचे टाळा ठोको आंदोलन

छत्रपतींच्या बाजूला पुरंदरे यांचे शिल्प बनवणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी आज बालगंधर्व रंगमंदिर येथे टाळा ठोको आंदोलन करण्यात येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 28 Aug 2023
  • 01:34 pm
Balgandharva Rangmandir : बालगंधर्व रंगमंदिरात छत्रपतींबरोबर पुरंदरेंचे शिल्प, संभाजी ब्रिगेडचे टाळा ठोको आंदोलन

संभाजी ब्रिगेडचे टाळा ठोको आंदोलन

शिल्प उभारणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, संघटनेची मागणी

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या शेजारी बाबासाहेब पुरंदरे यांचे शिल्प उभारण्यात आले आहे. त्यामुळे शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेडसह अन्य संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपतींच्या बाजूला पुरंदरे यांचे शिल्प बनवणाऱ्या व्यक्तीवर  कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी आज बालगंधर्व रंगमंदिर येथे टाळा ठोको आंदोलन करण्यात येत आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात २० ऑगस्ट रोजी एका आयोजित कार्यक्रमादरम्यान पुरंदरे यांचे शिल्प उभारण्यात आले आहे. मात्र, पुरंदरे यांची उंची छत्रपती यांच्या उंची बरोबर दाखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आक्षेप घेत शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आज सकाळी १२ वाजल्यापासून बालगंधर्व रंगमंदिरात ठाण मांडूण बसले आहेत. यावेळी त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पुरंदरे यांचे शिल्प साकारणाऱ्यावर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, बालगंधर्व विद्रुपीकरण आणि त्या आवारात असे शिल्प विना परवाना तयार करणे यासाठी प्रशासनावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा, शिवरायांच्या नावाने चालणाऱ्या ब्राह्मणी विचार संघटना यावर आक्षेप किंवा बोलणार नाहीत ? संबंधितावर कारवाई करून प्रशासनावर देखील गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही अशाच प्रकारचे अन्य शिल्प उभारू, असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest