Pune: तर गुन्हा काय केला ? कंडोम वाटणाऱ्या पुण्यातील पबचा उलटा सवाल, नेमकं काय म्हणाले ?

नववर्ष स्वागतासाठी पुण्यात एका पबने पार्टीचे निमंत्रण पाठवताना सोबत ‘कंडोम’ आणि ‘ओआरएस’चे पाकीट दिल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 30 Dec 2024
  • 03:35 pm
pune,Condoms,NEW YEAR,New Year 2025,New Year Day,Pune Crime News,Happy New Year 2025,पुणे, पब, नवीन वर्ष २०२५, पुणे पोलीस, पोलीस, कंडोम, ओआरएस

संग्रहित छायाचित्र

नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अशातच शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अजब प्रकार पहायला मिळाला. नववर्ष स्वागतासाठी पुण्यात एका पबने पार्टीचे निमंत्रण पाठवताना सोबत ‘कंडोम’ आणि ‘ओआरएस’चे पाकीट दिल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण पब व्यवस्थापकाने उलट सवाल उपस्थित केला आहे. 

मुंढवा येथील 'हाय स्पिरिट कॅफे' या पबने आपल्या नियमित ग्राहकांना नववर्षाच्या पार्टीसाठी पाठवलेल्या निमंत्रणासोबत कंडोम, ओआरएसचे पाकीट आणि सॅनिटरी पॅड्स पाठवल्याचे उघड होताच पोलिसांनी चौकशी सुरु केली. यावेळी पब व्यवस्थापकाने पोलिसांनाच उलट सवाल उपस्थित केला. 

नेमकं काय म्हणाले पब व्यवस्थापक?

कंडोम वाटणं हा गुन्हा नाही. आम्ही सुरक्षेच्या नावाखाली हे सर्व करत आहे. जनजागृती व्हावी यासाठी आम्ही कंडोम, सॅनिटरी पॅड्स वाटत आहे असा दावा संबंधित पबकडून करण्यात येत आहे. 

 

नेमकं काय घडलं?

पुण्यातील पबचा अजब कारनामा पाहायला मिळाला, पार्टीमध्ये येणाऱ्या तरुणांना एका पब कडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. या अजब प्रकारानंतर  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी या प्रकाराबाबत पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र, पब व्यवस्थापाकने कंडोम वाटणं हा गुन्हा नसल्याचे म्हटलं आहे. 

या घटनेनंतर पब कल्चरबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, शहरातील लोक यावर नाराजी व्यक्त करत आहेत.

Share this story

Latest