शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अजब प्रकार पहायला मिळाला. नववर्ष स्वागतासाठी पुण्यात एका पबने पार्टीचे निमंत्रण पाठवताना सोबत ‘कंडोम’ आणि ‘ओआरएस’चे पाकीट दिल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कंडोम वाटण्यात गुन्हा काय? असा उलट सवाल उपस्थित करणाऱ्या पबने आता मोठा निर्णय घेतला आहे.
मुंढवा येथील 'हाय स्पिरिट कॅफे' या पबने आपल्या नियमित ग्राहकांना नववर्षाच्या पार्टीसाठी पाठवलेल्या निमंत्रणासोबत कंडोम, ओआरएसचे पाकीट आणि सॅनिटरी पॅड्स पाठवल्याचे उघड झाले. पबच्या या अजब कृत्यामुळे पुणेकरांना चांगलाच धक्का बसला. मात्र, पब व्यवस्थापाकने कंडोम वाटणं हा गुन्हा नसल्याचे म्हटलं होते. दरम्यान, पबवर मोठ्या प्रमाणात होणारी टीका पाहता पब व्यवस्थापकाने आपला निर्णय बदलला.
Pune: तर गुन्हा काय केला ? कंडोम वाटणाऱ्या पुण्यातील पबचा उलटा सवाल, नेमकं काय म्हणाले ?
पब व्यवस्थापकाने थेट आयोजित करण्यात आलेली पार्टी रद्द करण्याच निर्णय घेतला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील पबचा अजब कारनामा पाहायला मिळाला, पार्टीमध्ये येणाऱ्या तरुणांना एका पब कडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहे. या अजब प्रकारानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी या प्रकाराबाबत पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र, पब व्यवस्थापाकने कंडोम वाटणं हा गुन्हा नसल्याचे म्हटलं आहे.
या घटनेनंतर पब कल्चरबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, शहरातील लोक यावर नाराजी व्यक्त करत आहेत.
कंडोम वाटण्यासंदर्भात पबचा अजब दावा
कंडोम वाटणं हा गुन्हा नाही. आम्ही सुरक्षेच्या नावाखाली हे सर्व करत आहे. जनजागृती व्हावी यासाठी आम्ही कंडोम, सॅनिटरी पॅड्स वाटत आहे असा दावा संबंधित पबकडून करण्यात आला होता.