तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू

नऱ्हे भागात पत्र्याच्या शेडचे काम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला. कामगारांना सुरक्षाविषयक साधने न पुरवल्याबद्दल ठेकेदाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पत्र्याच्या शेडचे काम करताना तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 30 Dec 2024
  • 03:50 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नऱ्हे भागात पत्र्याच्या शेडचे काम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला. कामगारांना सुरक्षाविषयक साधने न पुरवल्याबद्दल ठेकेदाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पत्र्याच्या शेडचे काम करताना तोल जाऊन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे.

शहरात मोठ्या संख्येने बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही काळजी घेत नसल्याचे वारंवार अशा घडणाऱ्या घटनांवरून दिसून येत आहे.  विलास बाबुराव पांचाळ (वय ६२, रा. आनंदप्रभात अपार्टमेंट, शिवणे) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विशाल खटावकर (वय ४२) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्घटनेत पांडुरंग बाबुराव काळे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ठेकेदार सुरेश अरविंद पांचाळ (वय ६३, रा. सहयोगनगर, वारजे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगारांना सुरक्षाविषयक साधने न पुरवता दुर्घटनेस जबाबदार असल्याच्या आरोपावरून ठेकेदाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आरोपी ठेकेदार सुरेश पांचाळ यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. विलास पांचाळ, पांडुरंग काळे हे त्यांच्याकडे कामाला आहेत. नऱ्हे भागातील वरद एंटरप्रायजेस येथे पत्र्याची शेड उभी करण्याचे काम ठेकेदार सुरेश पांचाळ यांना देण्यात आले होते. गुरुवारी दुपारी शेडचे काम विलास पांचाळ, पांडुरंग काळे, सुरेश पांचाळ, मंगेश विश्वकर्मा काम करत होते. त्यावेळी बारा फूट उंचीवरून पांचाळ, काळे, विश्वकर्मा पडले. तोल जाऊन पडल्याने विलास पांचाळ आणि पांडुरंग काळे यांना गंभीर दुखापत झाली, तसेच दुर्घटनेत सुरेश पांचाळ, मंगेश विश्वकर्मा यांना दुखापत झाली. चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच विलास पांचाळ यांचा मृत्यू झाला होता. पांडुरंग काळे यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करत आहेत.

Share this story

Latest