आयकॉनिक पुणेकरांना सलाम!

सध्याचे युग हे युध्दाचे नाही तर परस्परांमधील भिंती तोडण्याचे आहे. लष्कराच्या दक्षिण विभागाने गेल्या दीड वर्षात पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना जोडण्याचे काम केले असल्याचे मत लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी व्यक्त केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 30 Jun 2024
  • 04:13 pm

संग्रहित छायाचित्र

सामाजिक, आरोग्य सेवा, उद्योग, व्यवसाय आदी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाऱ्यांचा ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाईम्स मिरर’ने केला सन्मान

सध्याचे युग हे युध्दाचे नाही तर परस्परांमधील भिंती तोडण्याचे आहे. लष्कराच्या दक्षिण विभागाने गेल्या दीड वर्षात पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना जोडण्याचे काम केले असल्याचे मत लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी व्यक्त केले.

‘सीविक मिरर’- ‘पुणे टाईम्स मिरर’ ने दक्षिण विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘आयकॉनिक पुणेकर’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात सिंग बोलत होते. हा कार्यक्रम व्हीटीपी रिॲल्टीने प्रस्तुत केला होता. पुनीत बालन ग्रुप आणि पीएनजी ज्वेलर्सचे बहुमूल्य  सहकार्य कार्यक्रमाला लाभले होते. दक्षिण विभागाच्या राजेंद्रसिंहजी आर्मी मेस अँड इन्स्टिट्यूट (rsami) येथे रंगलेल्या शानदार सोहळ्यात पुण्यातील दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, संरक्षण, तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह, ‘सीविक मिरर’-‘पुणे टाईम्स मिरर’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज शर्मा, उपाध्यक्ष निरज शर्मा,  व्हीटीपी रिॲॅल्टीचे  व्यवस्थापकीय संचालक भूषण पालरेशा, कार्यकारी संचालक सचिन भंडारी, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, पीएनजी ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, ‘सीविक मिरर’-‘पुणे टाईम्स मिरर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश मल्होत्रा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. के. एच. संचेती, पीएनजी ज्वेलर्सचे कै. दाजीकाका गाडगीळ, सुहाना मसालाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, लेफ्टनंट जनरल शम्मी मेहता,  लेफ्टनंट जनरल अभिजीत गुहा, लेफ्टनंट जनरल व्ही. जी. पाटणकर, हनिवेल ऑटोमेशन आणि लाईटहाऊस फाऊंडेशनचे  गणेश नटराजन, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री अनु आगा, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन, पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर, पद्मश्री धनराज पिल्ले (माजी कर्णधार, भारतीय हॉकी), गिर्यारोहक उमेश झिरपे, अर्णवाज दमानिया (व्यवस्थापकीय विश्वस्त, कनेक्टिंग एनजीओ),  सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर, रविराज रिॲलिटीचे रवींद्र साकला, बिंद्रा हॉस्पिटॅलिटीचे जी. एस.  बिंद्रा, न्याती  ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नितीन न्याती,  सँटियागो रिॲलिटीचे  मुकेश कुमार साह, रिअर रियलटेकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहनीराज खोडदे, के. के ट्रॅव्हल्सचे  प्रोप्रायटर मधुरा केदार-कासार, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, उमरजी मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलचे  चिन्मय प्रमोद उमरजी, क्विकहील टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास काटकर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुहास हरदास, अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, विधिज्ञ आशुतोष श्रीवास्तव, कयानी बेकरीचे रुस्तम कयानी, प्रसन्न ट्रॅव्हल्सचे  प्रसन्न पटवर्धन, पूजा कम्युनिकेशन्सचे नरेंद्र परमार, जयराज ग्रुप आणि कंपनीचे राजेश शहा, चितळे बंधू मिठाईचे इंद्रनील चितळे, रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रा. सूरज शर्मा, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष  प्रा. संजय बी चोरडिया, ट्युलिप ग्रुपचे संस्थापक - अध्यक्ष  संजय हरिप्रसाद वर्मा, ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री विजय घाटे, दोराबजी आणि सन्सचे  डॅरियस दोराबजी, योग प्रशिक्षक  राजश्री तुपे, शास्त्रीय नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. पुण्यातील गणेशोत्सव चळवळीचे पाईक असलेल्या गणेशोत्सव मंडळांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये मानाचे पाच गणपती कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी लेफ्टनंट जनरल सिंग म्हणाले, सैन्य केवळ देशाचे संरक्षण करण्याचे काम करत नाही तर त्यापेक्षाही मोठे काम करते. नागरिकांनी सैन्याची कामगिरी जाणून घ्यायला हवी. भारताच्या सीमा अजूनही असुरक्षित आहेत. त्यामुळे शांतता काळातही सैन्याला सतत युध्दाच्या तयारीमध्ये राहावे लागते.

‘सीविक मिरर’-‘पुणे टाईम्स मिरर’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज शर्मा म्हणाले, ‘‘पुरस्कार हा जबाबदारीची भावना वाढविणारा असतो. आज आपल्यासोबत अनेक दिग्गज असून त्यांचे कर्तृत्व आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाईम्स मिरर’ नेहमीच शहरातील समस्यांना भिडत असतात. त्याचबरोबर शहरातील कर्तृत्ववानांचा सन्मान करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भारतीय लष्कराने आपल्यासोबत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.’’

समाजात मूल्यांची जोपासना होण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील मान्यवरांच्या कार्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल.
- नीरज शर्मा, उपाध्यक्ष ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाईम्स मिरर’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest