पुणेकरांवर पाणीकपातीचे सावट; सत्ताधाऱ्यांना नाराजीचा फटका बसू नये म्हणून मतदान होईपर्यंत थांबला होता निर्णय, लवकरच कालवा समितीची बैठक

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. सत्ताधाऱ्यांना नाराजीचा फटका बसू नये म्हणून मतदान होईपर्यंत पाणीकपातीचा निर्णय थांबवण्यात आला होता.

संग्रहित छायाचित्र

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. सत्ताधाऱ्यांना नाराजीचा फटका बसू नये म्हणून मतदान होईपर्यंत पाणीकपातीचा निर्णय थांबवण्यात आला होता.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत पाऊस कमी झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे आता पाण्याचे नियोजन करावेच लागणार असल्याने पुणेकरांच्या माथी पाणी कपात मारली जाणार आहे. वरिष्ठ पातळीवरून याचा निर्णय घेतला जाणार असून ग्रामीण भागात द्याव्या लागणाऱ्या आवर्तनामुळे कपातीची शक्यता अधिक बळावली आहे.

 महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाण्याचे तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. तसेच शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा असमान होत असल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. धरणसाखळीत पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेला पाण्याचे नियोजन करताना नाकीनऊ आले आहेत.

शहराला १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल इतका पाणीसाठी धरणात आहे, असा दावा केला असला तरी पाण्याचे नियोजन करावेच लागणार आहे. कालवा समितीच्या बैठकीत पाणीकपातीबाबत निर्णय होणार होता. परंतु बैठक झाली नाही. ही बैठक येत्या दोन दिवसात होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या समितीच्या बैठकीत शंभर टक्के पुणे शहरासाठी पाणीकपातीचा निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे. कालवा समितीच्या गेल्या वेळी झालेल्या बैठकीत महापालिकेला वाढीव पाण्याची कोटा देण्यास नकार देत उलट ५० टीएमसी पाणीकपात केली होती. तसेच लिकेज बंद करून पाण्याची बचत करावी, असा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे आता होणाऱ्या बैठकीत पाण्याचा वाढीव कोटा मिळण्याची अशा धुसर आहे. त्यामुळे शंभर टक्के पाणी कपात कारावी लागणार आहे. असे  प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी वरिष्ठ पातळीवर याबाबतचा निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्या  तरी कोणतीही पाणीकपात नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणासाठ्यातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरेल, असे सांगून पुणेकरांनी काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे सांगितले आहे. परंतु दुसरीकडे शहरासह उपनगर भाग आणि समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा करताना पालिकेची दमछाक होताना दिसून येत आहे. समाविष्ट गावांमध्ये टॅंकरच्या १२०० ते १४०० फेऱ्या दररोज होत आहेत. उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरवायचा असेल तर आठवड्यातून एक दिवस तरी पाणीपुरवठा बंद ठेवावाच लागणार लागेल. नाही तर पुणेकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सीविक मिरर’ला सांगितले. त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. तसेच लिकेज आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आठवड्यातून एकदा पाण्याचा क्लोजर घ्यावा लागणार असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुण्यातील पाण्याचे गणित

- पुणे शहराला दररोज लागते १.५८ टीएमसी पाणी

- खडकवासला धरणात ६.७२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

- खडकवासला धरणात मागच्या वर्षी ९.१७ टीएमसी पाणीसाठा होत शिल्लक

- खडकवासला धरणातून एक आवर्तन सोडावे लागणार असल्याने पाणीकपातीचे संकट

- शहराला आणखी तीन महिने पाणी पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest