पुणे : महिला सुरक्षेबाबत ‘झीरो टॉलरन्स’; ‘स्ट्रीट क्राईम’ रोखणे ही प्राथमिकता

‘जर रस्त्यावर महिलांची छेडछाड (Harassment of women) होत असेल, कोणत्याही महिलांना पाण्याने भरलेले फुगे मारले जात असतील, पाठलाग केला जात असेल तर कडक कारवाई केली जाणार आहे.

 women's safety

महिला सुरक्षेबाबत ‘झीरो टॉलरन्स’; ‘स्ट्रीट क्राईम’ रोखणे ही प्राथमिकता

पुणे : ‘जर रस्त्यावर महिलांची छेडछाड (Harassment of women)  होत असेल, कोणत्याही महिलांना पाण्याने भरलेले फुगे मारले जात असतील, पाठलाग केला जात असेल तर कडक कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी अशी प्रकरणे गांभीर्याने घेण्याचे आदेश दिले आहेत. महिला सुरक्षेबाबत (Women's safety)‘झीरो टोलरन्स’ धोरण (Zero tolerance policy) असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) म्हणाले. 

रस्त्यावर किरकोळ कारणावरून हाणामारी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. सिग्नलला किंवा रस्त्यावर किरकोळ कारणावरून रोडरेजमधून हाणामारी होते. यापुढे रस्त्यावर घडणारे गुन्हे रोखणे ही आमची प्राथमिकता असणार आहे. सार्वजनिक ठिकाणांवर गुन्हेगारी कारवाया अगर कृत्य केले तर कडक कारवाई केली जाणार असल्याचे तयांनी सांगितले. वाहनांची तोडफोड केली तर परिणाम भोगावे लागतील असेही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सराईत आणि अभिलेखावरील गुन्हेगारांची झाडाझडती सुरू आहे. एमपीडीए, मोक्कामधील जामीनावरील गुन्हेगार, फरार आरोपी, शस्त्र बाळगल्याचे गुन्हे (आर्म अॅक्ट) असलेले गुन्हेगार अशा सर्वांची धरपकड सुरू आहे. शहरातील गुन्हेगारांची यादी तयार केली जात आहे. येत्या दोन महिन्यात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. विविध भागात गस्त वाढविण्यात आली आहे. झोपडपट्टयायांमध्ये देखील गस्त वाढवण्यात आली आहे. पोलीस चौक्यांचे मजबूतीकरण सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी  सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest