पुण्यातील एम जी रोड जवळ अपघाताचा थरार; कॅम्प परिसरात कारने दिली ७-८ दुचाकींना धडक, पाहा व्हि़डिओ

शहरातील एका चार चाकी गाडी ने दिली तब्बल ७ ते ८ गाड्यांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात शहरातील एम जी रोड जवळ आज शुक्रवार (दिं. २६) रोजी घडला.

Pune MG Road Accident

पुणे : शहरातील एका चार चाकी गाडी ने दिली तब्बल ७ ते ८ गाड्यांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात शहरातील एम जी रोड जवळ आज शुक्रवार (दिं. २६) रोजी घडला. या अपघातामुळे ७ ते ८ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालकाला अचानक फिट आल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले. दरम्यान यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले. या अपघातात १ जण किरकोळ जखमी झाला आहे. (Pune MG Road Accident) 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by civicmirror (@civicmirrorpune)

प्राथमिक माहितीनुसार, एक चार चाकी पुण्यातील एम जी रोड जवळील एका रस्त्यावरून जात होती. गाडी चालवत असताना चालकाला अचानक फिट आली आणि त्याचे गाडीवर चे नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या ७ ते ८ दुचाकी गाड्यांना ही धडक बसली. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. यामध्ये ७ ते ८ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest