पुणे: महापालिकेच्या वतीने भिडे पूल परिसरात 'नदी स्वच्छता मोहिमे'चे आयोजन

पुणे: महापालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत शुक्रवारी (दि. २६) सकाळी ७ ते ९ या वेळेत भिडे पूल नदीकाठ परिसरात नदी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या २०२४ च्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत

महापालिकेच्या वतीने भिडे पूल परिसरात 'नदी स्वच्छता मोहिमे'चे आयोजन

पुणे: महापालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत शुक्रवारी (दि. २६) सकाळी ७ ते ९ या वेळेत भिडे पूल नदीकाठ परिसरात नदी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या २०२४ च्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त २२ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यात  स्वच्छता अभियान,  सिंगल युज प्लास्टिकबंदी अंमलबजावणीबाबत जनजागृती व कारवाई, ई-कचरा संकलन मोहीम या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानेच शुक्रवारी सकाळी 'नदी स्वच्छता मोहिमेचे' आयोजन करण्यात आले होते. या अभियानात विविध क्षेत्रातील २५० व्यक्तींनी सहभाग नोंदवला आणि ३७० किलो सुका कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. 

यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (इस्टेट), उपायुक्त संदीप कदम (घनकचरा व्यवस्थापन), उपायुक्त माधव जगताप (पर्यावरण विभाग), सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे (घनकचरा व्यवस्थापन),  सहाय्यक आयुक्त रवी खंदारे (शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय), पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, ब्रँड अॅम्बॅसीडर  रुपाली मगर,  विक्रांत सिंग, आम्रपाली चव्हाण, इमामुद्दिन इनामदार यांच्यासोबतच इतर अधिकारी आणि कर्मचारीवर्ग उपस्थित होते. तसेच मोहल्ला कमिटीचे सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांनी देखील आपला सहभाग नोंदविला. 

तसेच शहरातील काही महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी देखील नदी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. यात एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, कै. बंडोजी खंडोजी चव्हाण महावि‌द्यालय, कावेरी इंटरनॅशनल स्कूल, हिराभाई व्ही. देसाई कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक आणि स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, आदर पूनावाला क्लिनसिटी इनिशिएटिव्ह या संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

या अभियानामध्ये पर्यावरणपूरक, जागतिक तापमानवाढ संबंधी व स्वच्छता विषयक गीत सादर करण्यात आले. तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी.यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सर्वांना पर्यावरणपूरक सवयी जोपासण्याविषयी आवाहन केले. तसेच सिंगल युज प्लास्टिक बंदीसंबंधी जनजागृती करण्यासाठी अक्षरस्पर्श मतिमंद विद्यालय/कार्यशाळा यांच्यामार्फत अपंग, मतिमंद व निराधार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे सहभागींना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींनी माझी वसुंधरा व मतदार जागृती शपथ घेतली आणि कार्यक्रम संपन्न झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest