२ हजारच्या नोटेला श्रद्धांजली देत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा येत्या ३० सप्टेंबर पर्यंत बंद करणार असल्याची माहिती दिली आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद पुण्यात उमटताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात २००० च्या नोटेला हर घालून श्रद्धांजली वाहत अनोखे आंदोलन केले आहे.
पुणे विद्यापीठ रोडवर असणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “२०१६ मध्ये जेव्हा नोटबंदी करण्यात आली, त्यावेळी नवी दोन हजार रुपयांची नोट काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता दोन हजार रुपयांची नोटबंदी करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घेतला आहे.”
“पंतप्रधान मोदींना या देशाचे वाटोळ करायचा आहे. त्यांना हुकूमशाही पद्धतीने अशा प्रकारचे निर्णय लादून जनतेचे नुकसान करायचा आहे. त्यांना संसाराचा, व्यवसायाचा अनुभव नसल्यामुळे या देशाचा वाटोळ होत आहे”, असेही प्रशांत जगताप यांवेळी बोलताना म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.