पुणे ते छत्रपती संभाजीनगर एसटी बससेवा पूर्ववत
जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्ज नंतर पुण्यातुन छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बससेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. १ सप्टेंबर २०२३ पासून या बस सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज म्हणजे ५ तारखेपासून या सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.
पुणे ते संभाजीनगर ही बस सेवा बंद असल्यामुळे पुण्यातून संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. बससेवा बंद असल्यामुळे परिवहन महामंडळाला देखील मोठा फटका बसला आहे. जालनामध्ये सुरू असणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून मराठी बांधव आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले होते. याच पार्श्वभूमीवर या सर्व बस सेवा बंद ठेवण्यात आला होत्या.
चार दिवसांपासून नागरिकांची होणारी गैरसोय पाहता आता पुन्हा एकदा या सर्व बस सुरू करण्यात आल्या आहेत. एसटी परिवहन मंडळाच्या विविध बसेस जसे की शिवनेरी परिवर्तन शिवशाही अशा सर्व गाड्या आता मराठवाड्याकडे जाण्यासाठी सज्ज झालेल्या पाहायला मिळत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.