पुणे: ‘ब्लॅक स्पॉट’वरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाय करा - जिल्हाधिकारी

पुणे: जिल्ह्यात आणि शहरातील ब्लॅक स्पॉटवरील अपघात रोखण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे आदेश  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

Pune, Accident, Black Spot, Dr. Suhas Diwse, Collector, Pune Collector Dr Suhas Diwase

संग्रहित छायाचित्र

पुणे: जिल्ह्यात आणि शहरातील ब्लॅक स्पॉटवरील अपघात रोखण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे आदेश  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Pune Collector Dr Suhas Diwase ) यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे योगेश्वर डी.,  पुणे मनपाचे वाहतूक नियोजक निखील मिझार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उप अभियंता एम. डी. कजरेकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दिवसे म्हणाले, अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटवरची उपाययोजना खूप महत्वाची आहे. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांचा डेटा तयार ठेवावा. उपाययोजनानंतर ब्लॅक स्पॉटवर किती अपघात कमी  झाले, अपघात कोणत्या वेळी झाले याची माहिती मिळण्यास  मदत होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महानगरपालिकांनी रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, तसेच अल्पकालीन, दीर्घकालीन योजना आखाव्यात. संबंधित विभागाने आवश्यकतेनुसार रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, सूचना फलक, रोड मार्किंग्ज, रस्त्यावरील परावर्तक, झेब्रा क्रॉसिंग, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी बसविण्याची कार्यवाही करावी. दर तीन महिन्यांनी रोड मार्किंग्ज, रस्त्यावरील परावर्तक, झेब्रा क्रॉसिंग, साईड पट्ट्या  रंगवाव्यात. रस्त्यावरील सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर स्वच्छतागृहे, शौचालयासारख्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात.

शहरात होणाऱ्या अपघातामध्ये दुचाकीस्वार, पादचाऱ्यांची संख्या अधिक आहे. वाहतुक विभागाने अपघात कमी करण्यासाठी रस्ता वाहतुक नियम तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाययोजना कराव्यात. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने चांदणी चौकात वाहनचालकांना समजेल आणि दिसेल असे फलक रस्त्यावर लावावेत. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने, वाहनचालकांची संबंधित विभागाने नियमित तपासणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पुणे जिल्ह्यात ३९ ब्लॅक स्पॉट्स आहेत, असे यावेळी बहीर यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीत 'ब्लॅक स्पॉट'  दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, युनिसेफ व आयरॅड संस्थेने सादरीकरण  केले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest