पुणे : वाहन प्रदूषण चाचणीतील बनवेगिरीला आता आळा

वाहन प्रदूषण चाचणी तपासणीची संगणकीय कार्यप्रणाली- २ अद्ययावत केली आहे. राज्याचा परिवहन विभाग व केंद्राच्या  रस्ता वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने ६ जूनपासून ही कार्यप्रणाली अद्ययावत केली. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत ही प्रणाली हाताळली जात असून आता वाहन प्रदूषण चाचणी म्हणजे पीयूसी अधिक विश्वासार्ह करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे बनावट पीयूसीला आता आळा बसू शकेल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sun, 16 Jun 2024
  • 12:06 pm
Pune vehicle polution

वाहन प्रदूषण चाचणीतील बनवेगिरीला आता आळा

वाहन तपासणीसाठी अद्ययावत संगणक कार्यप्रणाली, तपासणीत अधिक पारदर्शकता

दयानंद ठोंबरे :
वाहन प्रदूषण चाचणी तपासणीची संगणकीय कार्यप्रणाली- २ अद्ययावत केली आहे. राज्याचा परिवहन विभाग व केंद्राच्या  रस्ता वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने ६ जूनपासून ही कार्यप्रणाली अद्ययावत केली. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामार्फत ही प्रणाली हाताळली जात असून आता वाहन प्रदूषण चाचणी म्हणजे पीयूसी अधिक विश्वासार्ह करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे बनावट पीयूसीला आता आळा बसू शकेल.

प्रदूषण चाचणी केंद्राची जागानिश्चिती ही उपग्रहांच्या साहाय्याने करण्यात आली असून निश्चित अक्षांश व रेखांश जागेच्या ५० मीटर परिघातच वाहन तपासणी करता येणार आहे. पूर्वीच्या तपासणी पद्धतीमध्ये आता तीन टप्पे वाढवण्यात आले आहेत. यामध्ये गाडीच्या नंबरप्लेटचा फोटो काढला जाणार आहे. तसेच पीयूसी सेंटरसोबत गाडीचाही फोटो असणार आहे. हा तपासणीचा व्हीडीओ ५ सेकंदाचा असेल. ही सर्व तपासणी ऑनलाईन होणार असल्यामुळे तपासणीला थोडा जास्त वेळ लागेल. मात्र, तपासणी अचूक, नियमानुसार होईल. तपासणीनंतर हा डेटा लगेच परिवहनच्या पोर्टलवर अपडेट होईल. त्यामुळे नागरिकांना तपासणी प्रमाणपत्र आपल्यासोबत बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.

पोलीस वाहनाचा नंबर टाकून हे प्रमाणपत्र वैध आहे की नाही ते पाहू शकतात. वाहनाचा विमा उतरताना पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे सर्व अपलोड करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे वाहन तपासणीत जास्त पारदर्शकता निर्माण होईल.  नवीन चाचणीस थोडा जास्त वेळ लागणार आहे, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी आणि प्रदूषण चाचणी केंद्रांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रदूषण चाचणी केंद्र संघटनेचे शैलेंद्र कांबळे यांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest