PUNE: शिव रूद्र मर्दानी आखाडा ट्रस्ट संस्थेने राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

पुणे: छत्रपती शिवाजीनगर (Shivajinagar) गावठाण येथील शिवकालीन मर्दानी युध्द कलेचे प्रशिक्षण देणारी शिव रूद्र मर्दानी आखाडा ट्रस्ट या संस्थेने राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धा २०२४ या मध्ये

Shivajinagar

PUNE: शिव रूद्र मर्दानी आखाडा ट्रस्ट संस्थेने राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

पिंपरी चिंचवड येथे राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेचे २०२४ आयोजन

पुणे: छत्रपती शिवाजीनगर (Shivajinagar) गावठाण येथील शिवकालीन मर्दानी युध्द कलेचे प्रशिक्षण देणारी शिव रूद्र मर्दानी आखाडा ट्रस्ट या संस्थेने राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धा २०२४ या मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. पिंपरी चिंचवड येथे राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राज्यातील विविध शहरांमधून संघ सहभागी झाले होते. यामध्ये शिव रूद्र मर्दानी आखाडा ट्रस्ट यांनी प्रथम क्रमांक मिळवला.  (Pune News)

या स्पर्धेत विनायक सुतार, ओंकार तिखे,  निखिल वाकोडे, अर्जुन वाकोडे, हर्षदा देशमुख, सिद्धांति तिखे, देवश्री देशमुख, दिव्या कराडे, अर्जुन सूर्यवंशी, वेदांत बारगजे या खेळाडूंनी सहभाग घेतला. जलाल सय्यद, वैभव मोहोळ, सागर सुर्यवंशी यांनी संघ व्यवस्थापनाचे काम पाहिले. या सर्वाना संस्थेचे अध्यक्ष विजय आयवळे-पाटील तसेच राहूल मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. 

गेली १५ वर्षे हि संस्था शिवकालीन मर्दानी युध्द कलेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे . श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा या माध्यमातून वेगवेगळ्या बॅचेस द्वारे वय वर्षे ५  पासून ते ४५ वयाच्या मुले-मुली, तरूण-तरूणी यांना परंपरागत मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. आपला परंपरागत शौर्यकलेचा वारसा जपला जावा. याची शासन दरबारी दखल घेतली जावी. हा खेळ भविष्यात सर्व शाळांमधून शिकविला जावा व इतर खेळासारख्याच याही खेळाच्या शालेय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात. जेणे करून सर्व शाळांमधून हा खेळ खेळला जाईल. आपली परंपरागत कला जपली जाईल असा संस्थेचा हेतु आहे. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest