पोलीस आयुक्त रितेश कुमार
पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कोयत्याचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही टोळक्यांकडून सुरू आहे. यामुळेच आता पुणे पोलीस आयुक्त यांनी ॲक्शन मोडवर येत वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांचे निलंबन केले आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेला घटनेनंतर पेरुगेट पोलीस चौकी येथील तीन जणांचे निलंबन केले होते. यानंतर आता सहकारनगर पोलीस ठाण्यातील चार जणांचे निलंबन करण्यात आले आहे.
सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये एका महाविद्यालयीन मुलीवर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला होता. यावेळी पेरू गेट पोलीस चौकीमध्ये ड्युटीवर असताना देखील एकही पोलीस उपस्थित नसल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर सहकारनगरमध्ये काही गाड्यांची तोडफोड झाली. तेव्हा देखील पोलिसांनी आपले काम जबाबदारीने पार न पडल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
सहकारनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडगे, पोलीस निरीक्षक हसन मुलानी, पोलीस उपनिरीक्षक मारुती वाघमारे तसेच या पोलीस स्टेशनमधील दोन हवालदार संदीप पोटकुले व विनायक जांभळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोनवेळा तलवार व कोयत्याचा वापर झाला असून यावर पोलीस कार्यरत असताना देखील याची गांभीर्याने दखल घेतली. त्यामुळे, ही सर्व कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.