पुणे : ‘पब-बार-रेस्टॉरंट’साठी रात्री दीडचीच वेळ; रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल रात्री साडेअकराला बंद

पब-बार-रेस्टॉरंट-हॉटेल्स-आयस्क्रीम पार्लर’ अशा (Pubs-Bars-Restaurants-Hotels-Ice Cream Parlors) आस्थापणांसाठी रात्री दीडपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आलेली आहे. त्याकरिता मार्गदर्शक सूचना देखील लागू करण्यात आलेल्या असून त्याची अमलबजावणी सुरू आहे.

पुणे : ‘पब-बार-रेस्टॉरंट’साठी रात्री दीडचीच वेळ; रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल रात्री साडेअकराला बंद

नियमांचा भंग केल्यास होणार कडक कारवाई

पुणे : पब-बार-रेस्टॉरंट-हॉटेल्स-आयस्क्रीम पार्लर’ अशा (Pubs-Bars-Restaurants-Hotels-Ice Cream Parlors)  आस्थापणांसाठी रात्री दीडपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आलेली आहे. त्याकरिता मार्गदर्शक सूचना देखील लागू करण्यात आलेल्या असून त्याची अमलबजावणी सुरू आहे. नियमभंग केल्यास त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्स आणि हातगाड्या यांना रात्री साडेअकरापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र त्यांना गाड्या बंद कराव्या लागणार असल्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी दिले. 

दारूच्या दुकानांच्या समोर अथवा आसपास अंडाभुर्जी, चायनीज आदी खाद्यपदार्थांच्या  हातगाड्या आणि स्टॉल लावले जातात. अनेकदा दारू खरेदी करून मद्यपी त्याठिकाणी जाऊन दारू पित बसतात. तयाविषयी कडक मोहीम सुरू केली जाणार आहे. या हातगाड्या देखील संध्याकाळी वेळेत बंद केल्या जाणार आहेत. यासोबतच देशी दारुची दुकाने उघडी ठेवण्यासाठी सकाळी आठ ते रात्री दहा अशी वेळ असते. मात्र, अनेक दुकाने सकाळी लवकर उघडतात आणि रात्री उशिरा बंद केली जातात. त्यांना देखील वेळेचे पालन करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी कोणताही खाद्य पदार्थ पुरवण्यास परवनगी नाही. अवैध दारू आणि तत्सम पदार्थ विक्रीवर देखील कडक कारवाई केली जात असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest