पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात 'एक खिडकी' कक्षाची स्थापना

पुणे: आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा (अ.जा.) मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 22 Oct 2024
  • 12:28 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे: आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा (अ.जा.) मतदारसंघाच्या (Pune Cantonment Assembly Constituency ) निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे.

या कक्षामार्फत निवडणूक प्रचारासंबंधी वाहन परवाने, प्रचार सभा, कोपरा सभा परवानगी, तात्पुरत्या पक्ष कार्यालयासाठीची परवानगी, रॅली, मिरवणूक, रोड- शो, पदयात्रा यासंबंधीच्या परवानग्या, स्टेज, बॅरीकेटस्, व्यासपीठासाठीच्या परवानग्या त्यासंबंधीत करावयाच्या अर्जांचे विहित नमुने व आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती उमेदवारांना पुरविण्यात येणार आहेत.

एक खिडकी कक्षातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय भारतरत्न सर विश्वेश्वरय्या हॉल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र ५, ३ रा मजला, अर्सेनल प्लॉट, हॉटेल सागर प्लाझासमोर, कॅम्प, पुणे याठिकाणी संपर्क साधावा, असेही श्री. भंडारे यांनी कळविले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest