संग्रहित छायाचित्र
पुणे: सर्वसामान्य कुटुंबातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना अल्प दरात डायलिसिसची सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयात (Kamla Nehru Hospita) एका संस्थेबरोबर करुन सेवा सुरु केली होती. मात्र या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या सुविधेमध्ये अनेकवेळा अडथळे येत होते. वारंवार डायलिसिस मशीन बंद पडण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे सेवा असूनही त्याचा लाभ घेता येत नव्हता. अखेर महापालिकेने सध्याच्या संस्थेसोबतचा करार रद्द करुन नव्याने एका संस्थेसोबत करार केला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी आणखी एका महिना तरी वाट पाहावी लागणार आहे. असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. (Pune)
महापालिकेच्या रुग्णालयात डायलिसिसचे उपचार घेणाऱ्यांची रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत उपचार घेणाऱ्या डायलिसिसच्या मशिनची संख्या फारच कमी आहे. या सोबतच अद्ययावत सुविधाही उपलब्ध नाही. महापालिका ‘डायलिसिस सेवा खासगी भागीदारी’ (पीपीपी) तत्त्वावर चालवले जाते. सुविधा वारंवार बंद पडत असल्याने याची जबाबदारी खासगी संस्थेवर ढकलून वैद्यकीय अधिकारी मोकळे होतात. असा रुग्णांचा अनुभव आहे. कमला नेहरू रुग्णालयातील मशिन गेल्या अनेक दिवस बंद पडत होती. त्यामुळे अनेक नागरिकांची आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची गैरसोय होत असते. ही सुविधेचा लाभ महिन्याला सुमारे २०० ते २५ रुग्णांसाठी होतो. मात्र केंद्र चालवताना संस्थेचेृ हलगर्जीपणाचा अहवाल आल्याने महापालिकने संस्थेसोबतचा करार रद्द केला आहे.
महापालिकेने सात वर्षांपूर्वी सुरू केलेले पहिले डायलिसिस केंद्र आहे आणि ते दहा वर्षे चालवण्याची सुविधा एका खासगी संस्थेला देण्यात आली होती. रुग्णालयात एकूण १५ मशीन्स होत्या. तसेच इतर ठिकाणी सात डायलिसिस केंद्रे काही अंतरावर आहेत. कमला नेहरु रुग्णालय पासून सर्वात जवळची डायलिसिसची सुविधा भवानी पेठेतील सोनवणे हॉस्पिटल येथे असून तेथे फक्त चार डायलिसिस मशीन आहेत. मात्र, सोनवणे रुग्णालयातील डायलिसिस युनिटमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी असल्याने रुग्णांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने नव्या संस्थेसोबतचा करार मान्य करुन सुविधा सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सोनवणे हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सुविधेसाठी चार ते पाच तास प्रतिक्षा करावी लागते. आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णालयात यावे लागते. परंतु गर्दी असल्याने डायलिसिससाठी पूर्ण दिवस खर्च होतो.
- सुखी जाधव, रुग्ण
मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या वाढत असताना, अधिक डायलिसिस केंद्रांची गरज आहे. संक्रमण काळात सेवा सुरू ठेवण्याची खात्री करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. महापालिकेने लवकरात लवकर नवीन पर्याय शोधण्यास सुरुवात केली असती तर रुग्णांची गैरसोय टळली असती. उपचाराचे शुल्क स्वस्त असल्याने उपचारासाठी नेहमीच गर्दी असते. पीएमसीने चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी मशीनची संख्या वाढवली पाहिजे.
- धनश्री मोने, रुग्ण.
माझ्या पत्नीला माझ्या डायलिसिस घ्यावे लागते. शहरात रुग्णांची संख्या जास्त आणि डायलिसिसची संख्या कमी असल्याने अधिक केंद्रांची गरज आहे.महापालिकेच्या रुग्णालयात मशीन कमी असल्यामुळे रुग्णांना वाट पहावी लागते. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.
- सोमेश्वर भाले, रुग्णाचे पती.
डायलिसिस सुविधा एका महिन्यापेक्षा जास्त काळ बंद राहणार आहे. आम्ही चांगली सुविधा देण्यासाठी दुसऱ्या संस्थेचा शोध घेत आहोत. प्रक्रियेसाठी एका महिन्यापेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिक आणि रुग्ण पीएमसीच्या इतर सात डायलिसिस युनिटमध्ये जाऊन उपचार घेऊ शकतात. कमला नेहरु रुग्णालयातील डायलिसिस सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका.