Pune News: न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेत पार पडला 'गगोला' उपक्रम
पुणे: २२ डिसेंबर च्या गणित दिवसाचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड (New English School) या प्रशालेत २ जानेवारी रोजी 'गगोला' म्हणजेच गणिताची गोडी लावणे हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत शाळेत गणिताच्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेतील प्रवेशद्वाराजवळ गणिताची मोठी रांगोळी काढण्यात आली व त्याचप्रमाणे पायथागोरसच्या प्रमेयाची प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केली. प्रत्येक वर्गातून विद्यार्थ्यांकडून गणिताचे विविध खेळ तयार करून घेण्यात आले . विद्यार्थ्यांकडून विविध बहुपृष्ठाकृती तयार करून घेतल्या . त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला गणितावर आधारित एक कृतिपुस्तिका देऊन त्यातील विविध खेळ, कोडी, गमतीजमती घेण्यात आल्या. या संपूर्ण उपक्रमासाठी 95 स्वयंसेवक तयार करण्यात आले होते. तसेच शाळेतील गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांनी गगोला हा उपक्रम वर्गा वर्गातून यशस्वीरित्या पूर्ण केला. (Pune)
या सर्व उपक्रमाचे नियोजन गणित विभाग प्रमुख श्रीमती स्वाती जज्जल ,श्री. देविदास झोडगे यांनी माननीय शालाप्रमुख श्रीमती सुनिता राव, पर्यवेक्षिका श्रीमती अनिता भोसले यांच्या मार्गदर्शनाने केले.
नववर्षाच्या पूर्वसंधेला मुलींनी मध्यरात्री १४४ वर्षाच्या अंक दिव्यांनी साकारला. यावेळी मध्यरात्री संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा डॉ. शरद कुंटे यांनी मुलींना छान गोष्ट सांगितले तसेच पद्य देखील म्हटले.यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष श्री खेमराज रणपिसे सर देखील उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.