पुणे: महापालिकेचे कारवाई सत्र सुरूच; महंमदवाडीतील बार, बेकरी, माऊंटन हाय, गार्लिक हॉटेलवर कारवाई

पुण्यात ड्रग्ज पार्टी रंगल्यानंतर शहरातील बेकायदा पब, बार, रेस्टॉरंटवरील थंडावलेल्या कारवाईला पुन्हा एकदा जोर आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील बेकायदा पब, बार, रेस्टॉरंटचे बांधकाम पाडण्याची धडक कारवाई सुरू आहे.

महापालिकेचे कारवाई सत्र सुरूच

बांधकाम विभागाकडून ६४,५४५ चौरस फूट बेकायदा बांधकाम पाडले

पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर एफसी रस्त्यावरील  'लिक्विड लिझर लाउंज' (एल थ्री) बारमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचे समोर आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून हॉटेल पब, रेस्टॉरंट, बारचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे सत्र सुरू केले आहे. शुक्रवारी (दि. २८) हडपसर भागासह महंमदवाडीतील  बार व बेकरी, माऊंटन हाय, गार्लिक हॉटेलसह इतर हॉटेलचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

पुण्यात ड्रग्ज पार्टी रंगल्यानंतर शहरातील बेकायदा पब, बार, रेस्टॉरंटवरील थंडावलेल्या कारवाईला पुन्हा एकदा जोर आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील बेकायदा पब, बार, रेस्टॉरंटचे बांधकाम पाडण्याची धडक कारवाई सुरू आहे.  एफसी रस्त्यासह शहरातील तब्बल २६ ठिकाणांवरील पब, बार, रेस्टॉरंटवर धकड कारवाई केली. हे कारवाईचे सत्र सुरू ठेवत शहरातील १९ आस्थापनांचे बेकायदा ५६,०६१ चौरस फूट इतके बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. यामध्ये बाणेर भागातील एस्को बारचे ८ हजार चौरस फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले. त्यानंतर म्हात्रे पूल, राजाराम पूलजवळील नदीपात्रातील डीपी रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर शुक्रवारी हडपसर भागात महापालिकेने कारवाई केली. यात एकूण ६४ हजार ५४५ चौरस फूट इतके बांधकाम पाडण्यात आले.

शहरात अनेक ठिकाणी पब, बार सुरू झाल्याने रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगत आहेत. या पार्ट्यांमध्ये आता ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचे व्हीडीओ व्हायरल झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. सुसंस्कृत पुण्यात अशा पार्ट्या रंगत असल्याने पुणेकरांकडून प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. शहरात काही घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते. त्यानंतर कारवाईचे सत्र सुरू होते. मात्र इतर वेळी प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 

या ठिकाणी केली कारवाई...

हडपसर (जुनी हद्द),  कल्ट बार , कड वस्ती, १०००० चौ. फूट

महंमदवाडी, बार व बेकरी, १००० चौ. फूट

महंमदवाडी, गार्लिक हॉटेल, ९०० चौ. फूट

महंमदवाडी, हायलॅन्ड बार, १५०० चौ. फूट

महंमदवाडी, माऊंटन हाय, ८५०० चौ. फूट

महंमदवाडी, हॉटेल तत्त्व, ६१०० चौ. फूट

उंड्री, फ्युजन ढाबा, ४००० चौ. फूट

उंड्री, सनराईज कॅफे, ३००० चौ. फूट

भवानी पेठ, शेड बांधकाम, १३४५ चौ. फूट

फुरसुंगी, आरसीसी बांधकाम, ७२० चौ. फूट

रविवार पेठ व गणेश पेठ, आरसीसी बांधकाम, २०८० चौ. फूट

वारजे, आरसीसी बांधकाम, ४४०० चौ. फूट

राजाराम पूल ते म्हात्रे पूल पत्राशेड, २१००० चौ. फूट

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest