पुणे : एनडीए पाषाण रोडवर गर्डर्स बसविण्यात येणार, रस्ता वाहतुकीसाठी बंद

एनडीए पाषाण रोडवर ९ गर्डर्स बसविण्यात येणार आहे. त्यामुळे वारजे वाहतूक विभाग अंतर्गत येणारा एनडीए पाषाण रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 4 Jul 2023
  • 12:25 pm
Pune:  एनडीए पाषाण रोडवर गर्डर्स बसविण्यात येणार, रस्ता वाहतुकीसाठी बंद

संग्रहित छायाचित्र

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक विभागाचे आवाहन

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौक येथे उड्डाणपुलाचे व रस्ता विकसनाचे काम चालू आहे. एनडीए पाषाण रोडवर ९ गर्डर्स बसविण्यात येणार आहे. त्यामुळे वारजे वाहतूक विभाग अंतर्गत येणारा एनडीए पाषाण रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत परिपत्रकाव्दारे वाहतूक विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

एनडीए पाषाण रस्ता हा ४ जुलै ते १५ जुलै २०२३ पर्यंत रात्री १२ वाजून ३० मिनिटांपासून ते ३ वाजून ३० मिनिटे या कालावधीकरीता रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबई-बंगळुरू महामार्गावरी एनडीए पाषाण रोड बंद

पर्यायी मार्ग : (जड वाहने वगळुन फक्त हलकी / चारचाकी वाहनांकरीता)

>> सातारा ते मुंबई हायवेची वाहतूक वेदभवन सव्र्हस रोडने पुढे मुंबई कडे इच्छित स्थळी जाईल.

>> मुंबई ते सातारा वाहतूक पाषाण रोडला वळवून रँप क्रं. ६ वरून वारजेकडे इच्छित स्थळी जाईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest