पुणे : एस पी कॉलेजच्या वसतिगृहात आग; अग्निशामक दलाकडून परिस्थिती आटोक्यात

आज दिनांक ७ जुलै रोजी सकाळी ०६•४४ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आग लागली असल्याची वर्दि नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून जनता अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

SP college fire

पुणे : एस पी कॉलेजच्या वसतिगृहात आग; अग्निशामक दलाकडून परिस्थिती आटोक्यात

पुणे : आज दिनांक ७ जुलै रोजी सकाळी ०६•४४ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आग लागली असल्याची वर्दि नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून जनता अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. (SP college fire)

घटनास्थळी पोहोचताच जवानांच्या निदर्शनास आले की, सदर ठिकाणी असणारया मुलांच्या वसतिगृहात भिंतीच्या बाहेरील बाजूस विद्युत पुरवठयासाठी वापरात असलेला सीटी मीटरने पेट घेतला होता व यादरम्यान मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. परंतु, त्याचवेळी तेथील कर्मचारीवर्ग यांनी तातडीने अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) वापरुन आग विझवण्याचा प्रयत्न करत अग्निशमन दल व महावितरण विभागास संपर्क केला होता. जवानांनी घटनास्थळी पाहणी करुन आग पुर्ण विझवत धोका दुर केला. त्याचवेळी महावितरणकडून पर्वती विद्युत विभागाचे कर्मचारी वेळेत दाखल होत त्यांनीदेखील पाहणी करुन पुढील कार्यवाही केली. या घटनेत सुदैवाने कोणी ही जखमी नाही.

या कामगिरीत जनता वसाहत अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक सागर देवकुळे व फायरमन महेंद्र सकपाळ, उमेश शिंदे, सागर पाटील, विजय वाघमारे यांनी सहभाग घेतला.

अग्निशमन दल शहर परिसरात विविध आस्थापना तसेच रहिवासी इमारती, शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, मॉल वा इतर ठिकाणी घेत असलेले अग्निविषयक सुरक्षा व उपाययोजना यांचे व्याख्यान व प्रात्यक्षिके यामुळे आज महाविद्यालयातील कर्मचार्यांनी प्राथमिक स्वरुपात अग्निरोधक उपकरण वापरत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest