Pune : ड्रेन्झाइम केमिकलने केली जादू; पाषाण तलावातील जलपर्णी काढण्यासाठी लागणार अंदाजे ३ कोटी रुपये

पाषाण तलावात (Pashan Lake) आणि राम नदीमध्ये जलपर्णी वाढल्याने नागरिक त्रासले आहेत. त्यावर महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्यासाठी महापालिका ड्रेन्झाइम केमिकलचा वापरण्याचा प्रयोग केला आहे.

Pune News

ड्रेन्झाइम केमिकलने केली जादू; पाषाण तलावातील जलपर्णी काढण्यासाठी लागणार अंदाजे ३ कोटी रुपये

पुणे: पाषाण तलावात (Pashan Lake) आणि राम नदीमध्ये जलपर्णी वाढल्याने नागरिक त्रासले आहेत. त्यावर महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्यासाठी महापालिका ड्रेन्झाइम केमिकलचा वापरण्याचा प्रयोग केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला असून चारच दिवसात जलपर्णी कोरडी पडल्याचे  समोर आले होते. सुकलेल्या जलपर्णीची लॅब टेस्टिंग करण्यात आले. त्याचा अहवाल सकारात्मक आला असल्याने आता हे केमिकल वापरण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पाषाण तलावातील जलपर्णीसाठी अंदाजे ३ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. (Pune News) 

शहरातील नद्या, तलावांमध्ये वाढत्या जलपर्णीमुळे पुणेकर चांगलेच वैतागले आहेत. जलपर्णी वाढल्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यावर महापालिकेकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. पाषाण तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ड्रेन्झाइम केमिकलचा वापर प्रायोगिक तत्वावर करण्यात आला होता. चार दिवसाचा याचा परिणाम दिसून आल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. १२) प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच पाठविलेल्या नमून्यांचा अहवाल सकारात्मक आल्याने पुढे हे केमिलकल वापण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. असे खेमनार यांनी सांगितले. 

पाषाण तलावात सुमारे ५० ते ६० टक्के जलपर्णी साठली आहे. या जलपर्णीची पूर्णपणे विल्हेवाट लावण्यासाठी कमीत कमी खर्च ३ कोटी रुपये येणार आहे.  या जलपर्णीवर ड्रोनने फवारणी करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात येणार आहे.  याकामासाठी एक वर्ष ते सलग ३ वर्षांसाठी टेंडर काढण्याचा विचार केला जाणार आहे. असे खेमनार यांनी सांगितले. 

जलपर्णी सातत्याने वाढत असल्याने डास, घाण आणि दुर्गंधीला सामोरे जावे लागते. यामुळे नागरिकांकडून वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या जातात. महापालिकेने ड्रेन्झाइम केमिकलचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला असून त्याचा परिणाम चांगला असल्याने इतर ठिकाणी हा प्रयोग राबविला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.    

शहरातील नद्यांमधील तसेच तलावांमधील जलपर्णीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नदीतील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेला दरवर्षी लाखो रूपये खर्च करावे लागतात. वारंवार जलपर्णी काढल्यानंतर ती पुन्हा वाढते. दरम्यान, महापालिकेकडून दरवर्षी जलपर्णी काढण्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निविदा काढल्या जातात. पाच वर्षांपुर्वी या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहारही झाला होता. वाढत्या जलपर्णीच्या समस्येवर पर्यावरण प्रेमींकडूनही सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest