पुणे : किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू

किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले राजगडावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 16 Aug 2023
  • 10:54 am
Pune: किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  ही घटना पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले राजगडावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

अजय मोहनन कल्लामपारा (वय ३३, रा. भिवंडी, ठाणे) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करीत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय हा आपल्या मित्रांसमवेत राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. त्यांचा चौघांचा ग्रुप होता. किल्ले राजगडावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत अजय पडला. यात त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest