पुणे : कल्याणीनगर आपघाताचे ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट’; पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने केला प्रसंग जीवंत

लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘क्रॅश इम्पक्ट असेसमेंट’ (Crash Impact Assessment) करून घेण्यात आले.

porsche car accident

पुणे : कल्याणीनगर आपघाताचे ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट’; पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने केला प्रसंग जीवंत

पुणे : लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘क्रॅश इम्पक्ट असेसमेंट’ (Crash Impact Assessment) करून घेण्यात आले. अपघात प्रसंगी नेमके काय घडले असावे?, दोन गाड्यांची टक्कर नेमकी कशी झाली असेल? मृतांना नेमका मार कसा बसला असेल? (porsche car accident)याचा या विश्लेषणात अभ्यास करण्यात आला. अपघात ग्रस्त वाहने, मृत आणि त्यांच्या अंगावरील जखमा यांचा सांगड घालण्याचा (को-रिलेशन) प्रयत्न करण्यात आला असून अपघात नेमका कसा घडला असावा याविषयी तंतोतंत अंदाज बांधण्यास त्यामुळे मोठी मदत मिळाली आहे. (Kalyani Nagar accident)

कल्याणीनगर येथे रविवार, १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास भरधाव पोर्शे कारने धडक दिल्यामुळे मोटार सायकलवरुन जात असलेल्या अनिश अवधिया (वय २७) आणि अश्विनी कोस्टा (वय २४) या दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून त्या अनुषंगाने तपास केला जात आहे. या फुटेजची मोठी मदत तपासामध्ये मिळाली आहे. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेली पोर्शे कार देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे. या कारची पोर्शे कंपनीच्या तज्ज्ञ टीमने पाहणी केली होती. हा अपघात नेमका कसा घडला असावा? नेमकी दोन वाहनांमध्ये कशी धडक झाली असावी? अनिश आणि अश्विनी हे कसे जखमी झाले असावेत याविषयी विविध कयास बांधण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट’ करून घेण्यात आले आहे. भरधाव पोर्शे कार जेव्हा मोटारसायकला धडकली त्यावेळी नेमकी घटना कशी घडली याबाबत अंदाज घेण्यात आला. 

याकरिता अनिश आणि अश्विनी जात असलेल्या मोटारसायकलप्रमाणे गाडी आणण्यात आली. त्या दोघांच्या शरीरयष्टीशी मिळतेजुळते व्यक्ती त्यावर बसवण्यात आले. त्यानंतर या अपघाताचा प्रसंग पुन्हा उभा करण्यात आला. या प्रसंगात पोलिसांनी उभ्या केलेल्या व्यक्तींना झालेल्या झालेल्या जखमा, गाडीचे झालेले नुकसान, धडक झाली तेव्हा त्याचा दोन्ही वाहनांवर पडलेला प्रभाव यांचा प्रत्यक्ष अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना झालेल्या जखमा, अपघातामधील वाहनांची स्थिती आणि पोलिसांनी तयार केलेल्या प्रसंगातील वाहनांची स्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट’मध्ये अपघाताविषयी अत्यंत महत्वपूर्ण अहवाल पोलिसांना मिळाला. 
==चौकट==
कल्याणीनगरचा अपघात नेमका कसा घडला असावा याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला जात आहे. प्रसंगाचे सीसीटीव्ही नसल्याने तो प्रसंग विविध पद्धतीने जीवंत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तपासाचा भाग म्हणून हा प्रसंग समजून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. ‘आर्टिफिशल इंटेलिजेन्स’चा वापर करून अपघाताचा प्रसंग उभा केला जाणार आहे. वाहनांचा वेग, त्यांची झालेली धडक, मृत असा सर्व प्रसंग ‘एआय’च्या माध्यमातून तपासला जाणार आहे. 
==चौकट==
अपघात घडला तेव्हा पाठीमागे बसलेली अश्विनी साधारणपणे २०-२५ फुट उंच उडून ती सुरुवातीला पोर्शे कारच्या काचेवर आदळली. त्यानंतर ती रस्त्यावर खाली आपटली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने केलेल्या ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट’मध्ये समोर आले आहे. दोन्ही वाहनांची लांबी रुंदी, त्यांच्या टायरची ऊंची आणि सद्यस्थिती आदींचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest