पुणे: येरवडा कारागृहाचे आणखी एक उपहार गृह; श्रृंखला उपहारगृह २ चे झाले भूमीपूजन

पुणे : कारागृह प्रशासनाच्या वतीने शृंखला उपहार गृह काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. या उपहारगृहाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या उपहारगृहांना मिळणारा प्रतिसाद पाहता अन्य जिल्ह्यात देखील ही उपहार गृह सुरू करण्यात आली आहेत.

पुणे: येरवडा कारागृहाचे आणखी एक उपहार गृह; श्रृंखला उपहारगृह २ चे झाले भूमीपूजन 

पुणे : कारागृह प्रशासनाच्या वतीने शृंखला उपहार गृह काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. या उपहारगृहाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या उपहारगृहांना मिळणारा प्रतिसाद पाहता अन्य जिल्ह्यात देखील ही उपहार गृह सुरू करण्यात आली आहेत. त्यापार्श्वभूमीवर आता शृंखला २ या नावाने आणखी एक उपहार गृह उभारले जाणार आहे. या उपहार गृहाचे भूमिपूजन कारागृह व सुधारसेवा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालींदर सुपेकर, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, खुल्या कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे, तुरुंगाधिकारी निशा श्रेयकर यांच्यासह  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शास्त्रीनगर येथे असलेल्या डॉन बॉस्को हायस्कुल गेट नं. 3 समोर, बंगला क्रमांक ९ येथे हा भूमिपूजन सोहळा पार पडला. 

यावेळी अतिरिक्त महासंचालक गुप्ता म्हणाले, की बंद्यांमध्ये सकारात्मकता वाढवण्याचा आणि त्यानं रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा उद्देश या उप्रकामामागे आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुप्ता यांनी केले. उपमहानिरीक्षक साठे यांनी श्रृंखला उपहार गृहामध्ये सर्व प्रकारच्या खाण्याचे पदार्थ मिळत असून या उपक्रमामुळे बंदयांचे मनोबल वाढले आहे. त्यांचे चांगल्या प्रकारे पुर्नवसन होत असल्याचे साठे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest