PMRDA News: आपत्ती व्यवस्थापन पथकावर आचारसंहितेची आपत्ती?

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्या वाहनांबरोबरच, उपकरणे आणि मनुष्यबळ आवश्यक असणार आहे. अर्थसंकपामध्ये यासाठी पाच कोटींची तरतूदही आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Pankaj Khole
  • Thu, 10 Oct 2024
  • 07:49 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नव्याने वाहने, उपकरणांची खरेदी होणार कधी? ठाण्याखालोखाल पुण्यातही पथक होणार कार्यान्वित

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्या वाहनांबरोबरच, उपकरणे आणि मनुष्यबळ आवश्यक असणार आहे. अर्थसंकपामध्ये यासाठी पाच कोटींची तरतूदही आहे. जिल्ह्याची गरज लक्षात व वाढते नागरीकरण या पार्श्वभूमीवर असे पथक असणे आवश्यक आहे. मात्र, यावरती अद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ही प्रक्रिया आचारसंहितेमध्ये पुन्हा अडकू शकते.

ठाणे जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथकाच्या धर्तीवर हे पथक स्थापन होणार आहे. अर्थसंकल्पात पाच कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सात हजार चौरस किलोमीटर क्षेत्रातील पीएमआरडीए हद्दीत जिल्ह्यातील ८१४ गावांचा समावेश आहे. या हद्दीमध्ये आपत्तीवेळी तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी पीएमआरडीएकडून 'पुणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स' (पीडीआरएफ) स्थापन करण्यात येणार आहे. त्या साठी सध्या उपलब्ध असलेल्या अग्निशमन पथकाकडे त्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. संबंधित विभागाचे प्रमुख हे त्या पथकाचे प्रमुख असतील.

पीएमआरडीए हद्दीतील आगीच्या घटना तसेच इतर काही अनुचित प्रकार घडल्यास मदतीसाठी अग्निशमन विभाग कार्यरत आहे. आगीच्या घटनांसह दरड कोसळणे, पावसाळ्यात नद्यांच्या पुरामुळे नुकसान होणे, अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशा आपत्तीच्या प्रसंगात आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये लोक वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. तसेच, ग्रामीण भागात देखील पुरामुळे नागरिकांची हाल झाले. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार करू नये या साठी आता हे पथक काम करणार आहे.  आपत्ती प्रतिसाद पथकासाठी वाहने व उपकरणांची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी पीएमआरडीए अर्थसंकल्पात पाच कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यात लाईफ जॅकेट, स्ट्रेचर, जीवरक्षक बोटी उपलब्ध होणार आहे. पीएमआरडीएकडे सध्या तीन अग्निशमन केंद्रे आहेत, तर एका केंद्राचे काम सुरू आहे; मात्र जिल्ह्याचा एवढा मोठा परिसर पीएमआरडीए हद्दीत येत असल्याने आणखी अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्रांची आवश्यकता आहे. त्यानुसार पीएमआरडीए हद्दीतील ३४ जागांवर या केंद्रांसाठी आरक्षण टाकले आहे. याबाबत पीएमआरडीए अग्निशमन विभागाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याची त्यांनी सांगितले.

अतिरिक्त मनुष्यबळ मिळणार
पीएमआरडीएच्या अग्निशमन विभागाकडे कायमस्वरूपी अधिकारी कमी आहेत. पर्यायाने कंत्राटी अथवा सोसायटी मध्ये निर्माण केलेल्या अग्निशमन विभागाची वाहने व मनुष्यबळ वापरले जात होते. दरम्यान, नव्याने कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले असल्याने मनुष्यबात मिळण्याची वाट मोकळी झाली आहे. येत्या आठवड्याभरात त्यावरती कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest