पुण्यात काँग्रेसकडून श्रद्धांजली
पुण्यातील हडपसर परिसरातील फातिमानगर चौक येथे काँग्रेसकडून ओडिशात झालेल्या अपघातातील व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी ओडिशा येथे कोरोमंडल एक्सप्रेस, मालगाडी आणि हावडा एक्सप्रेस या तिन्ही गाड्यांचा भयानक अपघात झाला होता. या अपघातामध्ये सुमारे २८८ प्रवासी मृत्युमुखी पडले होते.
या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पुणे शहर काँग्रेसने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. ओडिशा येथे झालेला हा अपघात नक्की अपघात आहे की हत्या असा प्रश्न देखील यावेळी काँग्रेसच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
यावेळी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष, शहराचे सर्व पदाधिकारी व माजी मंत्री उपस्थित होते. प्रवाशांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर तिरंगा मेणबत्ती लावण्यात आली तसेच जखमी प्रवाशी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.