पणत्या आणि दिव्यांनी उजळला नूमवी शाळेचा परिसर !
पुणे : पणत्यांची झगमगती आरास, दिव्यांच्या माळांची रोषणाई, आकर्षक आकाशकंदील आणि भारावलेले वातावरण अशा स्नेहमयी संध्याकाळी आम्ही नूमविय शाळेचा परिसर उजळून निघाला.
निमित्त होते आम्ही नूमवीयतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे आज बाजीराव रोड येथील नू.म.वि.प्रशालेच्या पटांगणात आयोजित केलेल्या दीपोत्सव २०२३ या कार्यक्रमाचे. वसुबारस या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर तसेच आम्ही नूमवीय संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर लोहोकरे, अध्यक्ष अजीत रावेतकर, सचिव मिलिंद शालगर उपस्थित होते.
सोहळा प्रमुख म्हणून अभिषेक पापळ आणि दर्शन किराड यांनी जबाबदारी पार पाडली. ‘आम्ही नूमवीय’तर्फे आयोजित दीपोत्सवाचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. प्रतिवर्षी प्रमाणे दीपोत्सवाच्या निमित्ताने आकाशकंदील, आकर्षक रांगोळी, दिवे आणि पणत्यांनी नूमविय शाळेचा परिसर उजळून निघाला. या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आणि शाळेच्या जुन्या आठवणी जागविण्यासाठी नूमवीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.