मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नीलम गोऱ्हेंनी दगडूशेठ गणपतीला ६० किलोचा मोदक केला अर्पण

पुणे : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर

Nilam Gorhe

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नीलम गोऱ्हेंनी दगडूशेठ गणपतीला ६० किलोचा मोदक केला अर्पण

शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने महाआरतीचे आयोजन

पुणे : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर (Dagadusheth Halwai Ganapati Mandir) येथे ६० किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला. शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने नीलम गोऱ्हेंच्या व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.  (Latest News Pune)

या प्रसंगी शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या समवेत शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर कुरुमकर, शिवसेना महिला आघाडीच्या पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत आदी मान्यवरांच्या बरोबरच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या नंतर डॉ.नीलम गोऱ्हे , प्रमोदनाना भानगिरे, रमेश कोंडे व पदाधिकारी यांनी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दर्शन घेवून महाआरती केली. 

या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना डॉ.नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या कार्यसम्राट मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास महाआरती करून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आघाडीस यश मिळावे त्यांचे जास्तीजास्त खासदार, आमदार निवडून यावेत व पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होवो अशी प्रार्थना केल्याचे सांगितले. 

तसेच येथे केलेल्या बहुसंख्य प्रार्थना परमेश्वराचे आशीर्वादाने सफल केल्याचे त्यांनी नमूद केले.  या महाआरतीच्या वेळी मिळालेले श्रीफल ९ फेब्रुवारी या तारखेस वाढदिवसाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांना अर्पण करण्यात येणार आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest