पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेसाठी ५ हजाराहून अधिक पोलीस तैनात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौरा आहे. या पुणे दौऱ्यादरम्यान त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देशाच्या पंतप्रधानांसाठी आज पुणे शहरात ५ हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पुणे शहरातील विविध ठिकाणची वाहतूक देखील बंद ठेवण्यात आलेली आहे. पहाटे सहा वाजल्यापासून पासून या सर्व पोलिसांचा बंदोबस्त शहरात पहायला मिळत आहे.
सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. या पूजेनंतर लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते एस पी कॉलेज ग्राउंड येथे ११ वाजून ४५ मिनिटांनी जाणार आहेत. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ग्राउंड येथे पुण्यातील महामेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी १२ वाजून ३० मिनिटांनी नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. अशा प्रकारचा एकूणच नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौरा असणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.