Pune temperature
पुणे शहराचे तापमान ११ ते १२ मे रोजी ४० ते ४२ अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाचा चटका बसणार आहे, अशी माहिती जागतिक स्तरावर चक्रिवादळांचा अभ्यास करणारे संशोधक व शास्त्रज्ञ विनीत कुमार यांनी दिली आहे.
ट्विटरवरून माहिती देताना कुमार म्हणाले की, आज (८ मे) हा पुण्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा शेवटचा दिवस असण्याची शक्यता आहे. ९ मेपासून पुणेकरांना अवकाळी पावसापासून दिलासा मिळेल. ९ मेपासून साधारण १६ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता नाही. मात्र, असे असले तरी तापमानात वाढ होईल.
As per the latest IMD-GFS, Today (8 May) is likely to be the last day of the ongoing rain thunderstorm activity in Pune. Dry spell for Pune from 9 May onwards. #punerains
— vineet kumar (@vineet_tropmet) May 8, 2023
सध्या पुण्याचे तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. ११ ते १२ मे रोजी हे तापमान वाढून ४० ते ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पुन्हा उन्हाचा चटका बसण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.