कोयता गँगचा पुन्हा धुडगूस, भर चौकात गाडी आडवी लावत ‘भाई’चा बर्थडे साजरा
पुण्यातील सहकारनगर परिसरात कोयता गँगने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच कोयता गँगने पुन्हा एकदा धुडगूस घातला आहे. टोळक्याने भर रस्त्यात गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे.
सध्या टोळक्यांचा वाढदिवसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका टोळक्याने भर चौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. हा केक कापत असताना टोळक्यांनी या ठिकाणी धिंगाणा घातला. तसेच आरडाओरडा करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक काही काळ दहशतीच्या छायेत होते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दोन जणांना अटक केली आहे. टोळक्यांचा सातत्याने धुडगुस सुरू असल्याने पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला की नाही? पोलीस टोळक्यांना कधी व्यसन घालणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.