Kondhwa : कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण करणं भोवलं, गुन्हा दाखल

पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये एका व्यक्तीने कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Sat, 20 May 2023
  • 10:09 am
कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण करणं भोवलं, गुन्हा दाखल

कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण

कुत्र्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये एका व्यक्तीने कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुनेद शेख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मिशन पॉसिबल संस्थेच्या पद्मिनी पीटर स्टंप यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने सायबेरियन हस्की या जातीचे कुत्र्याचे पिल्लू पाळले होते. १५ मे रोजी दुपारी या पांढऱ्या रंगाच्या सायबेरियन हस्की जातीच्या चार महिन्याच्या पिल्लाला जुनेद शेख यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मिशन पॉसिबल संस्थेच्या पद्मिनी पीटर स्टंप यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कोंढवा पोलीसांनी जुनेद शेख यांच्यावर गुन्हा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest