पुणे: केंद्रीय संचार ब्युरोमार्फत राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे 'कारगिल विजय दिवस' उत्साहात साजरा

पुणे: भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो, पुणे प्रादेशिक कार्यालय आणि MES's राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 'कारगिल विजय दिवस - रौप्य महोत्सवी वर्ष' कार्यक्रम उत्साहात साजरा (२६ जुलै) करण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 27 Jul 2024
  • 11:43 am
Kargil Victory Day - Silver Jubilee Year

पुणे: केंद्रीय संचार ब्युरोमार्फत राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे 'कारगिल विजय दिवस' उत्साहात साजरा

'कारगिल विजय दिवस - रौप्य महोत्सवी वर्ष' छायाचित्र प्रदर्शनाला विद्यार्थिनींची पसंती

पुणे: भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरो, पुणे प्रादेशिक कार्यालय आणि MES's राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 'कारगिल विजय दिवस - रौप्य महोत्सवी वर्ष' कार्यक्रम उत्साहात साजरा (२६ जुलै) करण्यात आला.

पिरंगुट येथील राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा येथे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय संचार ब्युरो वरिष्ठ लेखा अधिकारी अशोक कुमार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हर्षल आकुडे, पुणे अग्निशमन दलातील पहिली फायरवूमन मेघना सकपाळ, विंग कमांडर एम. यज्ञरामन (निवृत्त), प्राचार्या पूजा जोग आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकपर भाषणात क्षेत्रीय प्रचार अधिकारी हर्षल आकुडे यांनी आपल्या केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. केंद्रातील योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा ही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधताना मेघना सकपाळ म्हणाल्या, संरक्षण क्षेत्र अथवा अग्निशमन दल  हे काही वर्षांपूर्वी केवळ पुरुषांसाठी समजले जायचे, परंतु इथे काम करण्याची संधी महिलांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे, हे पाहून आनंद वाटतो. दृढ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुरुषांप्रमाणेच कोणत्याही क्षेत्रातील आव्हाने स्वीकारणे शक्य असल्याचे मत सकपाळ यांनी व्यक्त केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest