पुण्यात 'या' दिवशी पडू शकतो पाऊस! हवामान खात्याने वर्तविला अंदाज

पुण्यात मंगळवारी संध्याकाळी तापमान ३९.२ अंश सेल्सिअस नोंदले गेल्याची माहिती शिवाजीनगर येथील हवामान विभागाने दिली.

Pune Rains

संग्रहित छायाचित्र

पुणे: शहरात उन्हाचा चटका वाढत आहे. अशातच हवामान विभागाने येत्या रविवारी आणि सोमवारी शहरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.५ एप्रिल) राज्यभर पावसासाठी पोषक हवामान तयार होणार असून त्यामुळे पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  (Pune Rains)

पुण्यात मंगळवारी संध्याकाळी तापमान ३९.२ अंश सेल्सिअस नोंदले गेल्याची माहिती शिवाजीनगर येथील हवामान विभागाने दिली. 

शनिवार (दि. ६ एप्रिल) दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहून दुपारनंतर आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर पुढील दोन दिवस रविवार (दि.७ एप्रिल) आणि सोमवार (दि.८ एप्रिल) आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असे अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest