Pune News: आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या २४ तासात शासकीय मालमत्तेवरील साडेचौदा हजार प्रचारसाहित्य हटविले : निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता जिल्ह्यात १५ ऑक्टोबर रोजी लागू झाल्यानंतर पहिल्या २४ तासात सर्व मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने शासकीय इमारती आणि शासकीय मालमत्तेच्या आवारातील जाहिरात फलके, भित्तीपत्रके, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज आदी एकूण १४ हजार ५४२ प्रचारसाहित्य तात्काळ प्रभावाने हटविण्यात आले आहेत

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 17 Oct 2024
  • 06:36 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता जिल्ह्यात १५ ऑक्टोबर रोजी लागू झाल्यानंतर पहिल्या २४ तासात सर्व मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने शासकीय इमारती आणि शासकीय मालमत्तेच्या आवारातील जाहिरात फलके, भित्तीपत्रके, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज आदी एकूण १४  हजार ५४२ प्रचारसाहित्य तात्काळ प्रभावाने हटविण्यात आले आहेत, अशी आचारसंहिता कक्षाच्या समन्वयक अधिकारी तथा  निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे.

जुन्नर विधानसभा मतदासंघात १ हजार १६९, आंबेगाव १ हजार ४३०, खेड आळंदी १ हजार ४४६,  शिरूर ५६९, दौंड १ हजार ५३०,  इंदापूर ८२८, बारामती ८९०, पुरंदर १ हजार ९६६, भोर १५५, मावळ १ हजार १५४, चिंचवड १ हजार ७, पिंपरी (अ.जा.) ३८, वडगांव शेरी १५८, भोसरी ६५३, शिवाजीनगर १४८, कोथरुड १८५, खडकवासला ५६७, पर्वती २४५, हडपसर २३८, पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) ९१, कसबा पेठ मतदार संघात ७५ असे फलके, होर्डिंग्ज, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज असे शासकीय मालमत्तेवरील एकूण १४ हजार ५४२ प्रचारसाहित्य हटविण्यात आले आहेत. यामध्ये भित्तीवरील लिखान १ हजार ९८६, भित्तीपत्रके ३ हजार ६८५, जाहिरात फलके १ हजार ६४७, बॅनर्स २ हजार ७९५, ध्वज १ हजार ४३० आणि इतर साहित्य २ हजार २९९ यांचा समावेश आहे, अशी माहिती कदम यांनी दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest