विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी मुलाखत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी १८ आणि १९ रोजी मुलाखत होणार आहे. यामध्ये जवळपास २७ उमेदवारांचे अर्जांची निवड करण्यात आली आहे. यात पुण्यातून ११ उमेदरावारांची निवड करण्यात आली आहे. या मुलाखती आयआयटी बॉम्बे येथे होणार आहेत.
राज्य सरकारने स्थापन केलेल्या ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे (AICTE) माजी अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे मुलाखतीच्या पॅनलचे अध्यक्ष असणार आहेत. यात ११ उमेदवार पुण्यातील असून इतर मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नालंदा, लातूर, कोल्हापूर, रायगड आणि जळगावसह विविध शहरांतील उमेदवारांचा समावेश आहे. यात विज्ञान शाखेतून जास्तीत जास्त उमेदवार निवडले गेले आहेत. तर अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण, दूरस्थ आणि मुक्त शिक्षण, संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यासांशी संबंधितही काही उमेदवार आहेत.
हे आहेत पुण्यातील ११ उमेदवार :
अंजली दिनकर कुरणे (ज्येष्ठ प्राध्यापक, प्रमुख मानवशास्त्र विभाग आणि संचालक), अविनाश शंकर कुंभार (वरिष्ठ प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग), संदेश आर जाडकर (वरिष्ठ प्राध्यापक आणि प्रमुख, भौतिकशास्त्र विभाग), संजय डी ढोले (वरिष्ठ प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग), सुरेश वामनगीर गोसावी (वरिष्ठ प्राध्यापक आणि प्रमुख पर्यावरण विज्ञान विभाग आणि संचालक), विजय एस खरे (वरिष्ठ प्राध्यापक आणि प्रमुख संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास विभाग), संजीव ए सोनवणे (वरिष्ठ प्राध्यापक आणि प्रमुख शिक्षण आणि विस्तार विभाग), विलास शेषराव खरात (ज्येष्ठ प्राध्यापक गणित विभाग), मनोहर जी चासकर (प्राचार्य, रामकृष्ण मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आकुर्डी), पराग सी काळकर (संचालक, सिंहगड बिझनेस स्कूल, पुणे) आणि प्रा. राजू एन गच्छे (बायोटेक्नॉलॉजी विभाग) या ११ उमेदवारांचे अर्जांची निवड करण्यात आली आहे.