State Board Exam 2025 : राज्य मंडळाकडून दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च आणि बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा आठ ते दहा दिवस आधी परीक्षा होणार असल्यामुळे विद्यार्थी सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 22 Nov 2024
  • 02:17 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लेखी व प्रात्यक्षिक परिक्षांसंदर्भात मोठी घोषणा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च आणि बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा आठ ते दहा दिवस आधी परीक्षा होणार असल्यामुळे विद्यार्थी सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत.

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत, होणार आहे. तर, दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक गुरुवार, दि. २१ नोव्हेंबरपासून राज्य मंडळाच्या http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात, दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. त्यानंतर निकाल मे-जूनमध्ये जाहीर केला जातो. या दरम्यान विविध प्रवेश परीक्षा होतात. तसेच नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्टमध्ये होते. या सर्व प्रक्रियेत जाणारा वेळ, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणे, प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाने यंदा बारावी-दहावीच्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अंतिम वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून परीक्षा घ्यावी. अन्य संकेतस्थळांवरील किंवा यंत्रणेने छपाई केलेले, व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक गृहीत धरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest